सांगली : एका धक्कादायक घटनेमुळं सांगलीकर(passenger) पुरते हादरुन गेले आहेत. सांगलीतील शिराळा रोडवर एका पुलाखाली बेवारस प्रवासी बॅगेत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे. साधारणतः पंधरवड्यापूर्वी हा खून झाला असावा, असा अंदाज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहेत.
बेवारस प्रवासी बॅगेत(passenger) आढळलेला मृतदेह पुरुषाचा असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, मृतदेहाच्या गळ्याभोवती आणि शरीरास नायलॉनच्या दोरीनं बांधल्याचं आढळलं आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आलं.
श्वान पथक आणि ठसे घेण्यासाठी तज्ज्ञांना घटनस्थळीच पाचारण करण्यात आलं. तसेच, गुन्हेगारांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा खून पंधरा दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता असल्यानं पोलिसांसमोर या खुनाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान आहे.
काल (सोमवारी) सायंकाळी पुलाच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती निनावी फोनद्वारे शिराळा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तातडीनं पोलिसांनी याठिकाणी पाहणी केली असता एका बॅगेमध्ये सतरंजीमध्ये एक मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सतरंजीमध्ये गुंडाळलेला असून पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहास गळ्याभोवती आणि शरीराला नायलॉनच्या दोरीनं बांधल्याचंही दिसून आलं.
मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून त्याची केवळ कवटी, हाडं शिल्लक होती. तातडीनं श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यानं घटनास्थळी डॉ. जुबेर मोमीन, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. योगिता माने यांनी शवविच्छेदन केलं. कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी सुनील फुलारी, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक रितू खोकर, विभागीय पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.
श्वान त्याच ठिकाणी घुटमळला तसेच ठसे तज्ज्ञांना काही संशयास्पद माहिती मिळाली नाही. पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांतून बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मृतदेहाच्या अंगात पांढरा टी- शर्ट, कंबरेला पंचरंगी दोरा आढळून आला. मृतदेहाचे अवशेष तपासणीस पाठवले आहेत. त्यानंतर या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा :
…तर गयानात हिंदुस्थानचा उपांत्य सामना
सर्वच मतदारसंघांत गोंधळ घातलात, ‘वन नेशन, वन इलेक्शन’ कसे घेणार!
छत्रपती संभाजीराजे याचं अत्यंत महत्त्वाच वक्तव्य काय?