संध्याकाळ होईल आणखीनच खास! १० मिनिटांमध्ये घरी बनवा चमचमीत पनीर कोलीवाडा

पावसाळ्यात सगळ्यांचं काहींना काही चमचमीत आणि तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होते.(paneer) अशावेळी काय बनवावं सुचत नाही. संध्याकाळच्या नाश्त्यात नेहमी बाहेर विकत मिळणारे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात होणारे बदल, दूषित पाणी आणि इतर अनेक कारणामुळे पोटाचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चमचमीत पनीर कोलीवाडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. वजन कमी करताना तुम्ही पनीरचे सेवन करू शकता. पनीरमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले घटक असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आहारात पनीरचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया पनीर कोलीवाडा बनवण्याची सोपी रेसिपी

साहित्य:
पनीर
लाल तिखट
हळद
आलं लसूण पेस्ट
दही
जिऱ्याची पावडर
चाट मसाला
हिंग
तांदळाचे पीठ
कॉर्नफ्लावर
बेसन
काळीमिरी पावडर
लिंबाचा रस
आषाढी एकादशी स्पेशल! (paneer) उपवासाच्या दिवशी झटपट बनवा चविष्ट राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

कृती:
पनीर कोलीवाडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, बाजारातून विकत आणलेले पनीर काहीवेळा पाण्यात ठेवून घ्या.
मोठ्या वाटीमध्ये आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, चाट मसाला, चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर घालून मिक्स करा.
त्यानंतर त्यात लिंबाचा रस, कॉर्नफ्लावर, तांदळाचे पीठ (paneer) आणि चमचाभर बेसन पीठ घालून मिक्स करा.
तयार करून घेतलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात २ चमचे दही घालून मिक्स करा. घट्टसर मिश्रण तयार करून काहीवेळा बाजूला ठेवा.
तयार केलेल्या पिठात मध्यम आकाराचे तुकडे केलेले पनीर घालून व्यवस्थित मिश्रण लावून ठेवा.
कढईमध्ये तेल गरम करून त्यात पनीरचे तुकडे टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
तळून घेतलेले पनीरचे तुकडे वाटीमध्ये घेऊन त्यावर चाट मसाला आणि थोडासा लिंबू पिळून हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पनीर कोलीवाडा.

हेही वाचा :

पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर.. 

SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?

वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान