ईदचा गोडवा द्विगुणित करण्यासाठी घरात बनवा ‘ही’ आगळीवेगळी रेसिपी

ईद(eid)-उल-अजहा किंवा बकरी ईद हा मुस्लिम समुदायातील लोकांसाठी खूप मोठा सण आहे. भारतात हा सण शनिवार, 7 जून रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम घरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात, विशेषतः शेवया. किमामी सेवियान हा एक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट पदार्थ आहे, जो विशेषतः सणांच्या दिवशी बनवला जातो.

ही शेवया पातळ, बारीक आणि मऊ आहे, जी एका विशेष तंत्राचा वापर करून तयार केली जाते. किमामी सेवियानची गोडवा आणि पोत हे इतर शेवयांपेक्षा वेगळे बनवते. बकरी ईदच्या(eid) दिवशी किमामी सेवियान घरी कसे बनवायचे, जाणून घ्या.

किमामी सेवियान बनवण्याचे साहित्य

  • 2 कप मखाना
  • अर्धा कप तूप
  • अर्धा कप किसलेला नारळ
  • 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया
  • 1 चमचा खरबूजाच्या बिया,
  • 20 बदाम
  • 20 काजू
  • 1 कप खवा
  • 5 कप शेवया
  • 1 कप गरम दूध
  • 4-5 हिरव्या वेलची
  • 3 कप साखर
  • 2 कप पाणी
  • फूड कलर
  • 2 चमचे केवडा पाणी
  • 1 चमचा वेलची पावडर

किमामी सेवियान बनवण्यासाठी कृती

  • किमामी सेवियान बनवण्यासाठी सर्वांत प्रथम गॅस सुरु करा. त्यावर पॅन ठेवून त्यात तूप आणि दोन कप मखाना तळा. त्यानंतर एक मखाना बारीख करुन घ्या व उरलेले मखाना एका भांड्यात ठेवून द्या.
  • त्यानंतर त्याच पॅनमध्ये तूप घालून अर्धा कप किसलेला नारळ, सूर्यफुलाच्या बिया, टरबूजाच्या बिया, 20 बदाम, 20 काजू तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. हे सर्व भाजून झाल्यावर मखाना असलेल्या भांड्यात ठेवा.
  • त्यानंतर पॅनमध्ये एक चमचा तूप घालून 250 ग्रॅम बारीक शेवया भाजून घ्या. शेवया भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप मावा घाला आणि ते त्यात चांगले वितळू द्या. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात 1 कप गरम दूध घाला आणि शेवया चांगल्या प्रकारे शिजू द्या.
  • दुसऱ्या बाजूचा गॅस सुरु करुन त्यावर एखादे भांड ठेवून त्यात 2 कप पाणी टाका. त्या पाण्यामध्ये सुमारे 3 कप साखर घाला. साखर विरघळली की त्यामध्ये 4-5 हिरव्या वेलची, फूड कलर, 2 चमचे केवडा पाणी आणि 1 चमचा वेलची पावडर घाला.
  • आता शिजवलेल्या शेवया आणि सुक्या मेव्याचे तुकडे सिरपमध्ये घाला आणि चांगले मिसळा. लक्षात ठेवा की सिरपचे पाणी पूर्णपणे सुकले पाहिजे. त्यानंतर तुमचे किमामी सेवियान तयार आहे.हेही वाचा :