वाराणसीतील महाविद्यालयाच्या बॉईज हॉस्टेलच्या पायऱ्यांवर 19 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ती डबा घेऊन हॉस्टेलमध्ये गेली होती. घटनास्थळी काही औषधांचे रॅपर्स आढळले असून पोलिसांनी मोबाईल, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे.बॉईज हॉस्टेलच्या पायऱ्यांवर विद्यार्थिनी बेशुद्ध अवस्थेत आढळली.घटनास्थळी काही औषधांचे रॅपर्स सापडल्याने संशय वाढला.पोलिसांनी मोबाईल, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही तपास सुरू केला.

वाराणसी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाराणसीतील एका महाविद्यालयाच्या बॉईज हॉस्टेल परिसरात 19 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉस्टेलच्या पायऱ्यांवर ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी ही महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि कॉलेज परिसरातील सरकारी क्वार्टरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. घटनेच्या दिवशी ती बॉईज हॉस्टेल परिसरात डबा घेऊन गेल्याचे समोर आले आहे.मात्र ती कोणाला भेटण्यासाठी गेली होती आणि तेथे नेमकं काय घडलं, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. (hostel) काही माहितीनुसार ती जवळपास दोन तास हॉस्टेल परिसरात होती, त्यामुळे पोलिस विविध शक्यतांचा तपास करत आहेत. औषधांचे रॅपर्स आढळले घटनास्थळाजवळ काही औषधांचे रॅपर्स आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक वाढला आहे. हे साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा मृत्यूशी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. (hostel) तसेच विद्यार्थिनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून तिचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. हॉस्टेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात काही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (hostel) दरम्यान, पोलिसांनी अद्याप कोणताही निष्कर्ष जाहीर केलेला नाही. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहाय्यक पोस्टमास्तरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून तरुणाची आर्त हाक उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय सहाय्यक शाखा पोस्टमास्तरने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने तीन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली. या चिठ्ठीत त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वारंवार मानसिक छळ आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. माझ्या मृत्यूनंतर दोषींना शिक्षा होईपर्यंत माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नका, अशी आर्त हाकही त्याने या चिठ्ठीत आपल्या कुटुंबीयांना दिली आहे. या सुसुईड नोटमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील मैनपुरी जिल्ह्यात घडली.
हेही वाचा :
पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग