मुख्यमंत्री समोर येताच शेतकऱ्याला अश्रू अनावर, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ढसाढसा रडला शेतकरी?

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी थेट शेताच्या बांधावर पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. (farmer) यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि पिकांची स्थिती जाणून घेतली. मात्र, मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडताना एका शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आणि त्याचा अश्रूंचा बांध फुटला.

लातूर जिल्ह्यातील शेतीची पाहणी करताना फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. पिकांची झालेली अवस्था आणि पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहून शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता असल्याचे यावेळी दिसून आले. (farmer) याचदरम्यान एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडताना भावूक होत अश्रू ढाळले. शेतकऱ्याला रडताना पाहून फडणवीस यांनी त्याला जवळ घेत गळाभेट दिली. या प्रसंगामुळे उपस्थित वातावरणही भावूक झाले. यावेळी काही महिलांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत त्यांना ‘तुम्ही आमचे भाऊ आहात’, अशा भावना व्यक्त केल्या. दुष्काळामुळे शेतीवर आणि शेतकरी कुटुंबांवर निर्माण झालेल्या संकटाची तीव्रता या संवादातून समोर आली.

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले आहे. या भागात केवळ सुमारे ५० टक्के पाऊस झाल्याचे त्यांनी नमूद केले होते. (farmer) त्यामुळे पिकांवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर सरकारकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

दिशा सालियान हिच्या वडिलांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंकडे इशारा करत म्हटले?

विसर्जनापूर्वी गणरायाच्या कानात म्हणा, सर्व इच्छा होतील पूर्ण?

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये दुष्काळ जाहीर करा?