इचलकरंजी भाजप मंडळ अध्यक्षांचा पॉवरलूम असोसिएशनतर्फे सत्कार समारंभ उत्साहात पार पडला

भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा पुर्व मंडल अध्यक्षपदी श्रीरंग शिवाजीराव खवरे यांची तर पश्चिम मंडल अध्यक्षपदी शशिकांत मोहीते यांची व ग्रामिण मंडल अध्यक्षपदी बाळासाहेब माने यांची निवड झाल्याबद्दल दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.

प्रथम असोसिएशनचे अध्यक्ष पाटील यांनी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व यंत्रमागधारकांच्या वतीने नवनियुक्त तिनही अध्यक्षांचे स्वागत करून नुतन अध्यक्षांकडून इचलकरंजीच्या विकासासाठी भरीव कामाची तसेच सर्वसामान्य इचलकरंजी आणि परिसरातील नागरीकांचे प्रश्न आपल्या माध्यमातून सुटावेत अशा अपेक्षा व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना शशिकांत मोहिते यांनी इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असलेचे सांगून पक्ष वाढीसाठी व स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपाच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहु असे सांगून आम्हा तिघांना आपल्या असोसिएशनमध्ये बोलवून सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

या सत्कार प्रसंगी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफि क खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, सोमा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, राजाराम गिरी, प्राईड इंडिया टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष सुरेश आमाशे, उद्योजक सुकुमार देवमोरे, शिलकुमार पाटील यांच्यासह कारखानदार उपस्थित होते.

हेही वाचा :

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल

मैत्री, भेटायला बोलवलं अन् अत्याचार; १५ वर्षीय मुलीबरोबर खोलीत ‘नको ते घडलं’; परिसरात खळबळ

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO