एचआयव्ही म्हणजेच इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस.(vaccine) हा एक असा व्हायरस आहे जो थेट तुमच्या रोगप्रतिकार शक्तीच्या पेशींवर परिणाम करतो. ज्यामुळे इतर रोगांशी लढणे कठीण होते. या आजारावर मात करणे जवळजवळ अशक्य होते. पण गेल्या काही वर्षांपासुन जगभरातील अनेक वैज्ञानिक या गंभीर आजाराशी लढणारी लस तयार करण्याच्या प्रयत्नात होते. अलिकडेच या प्रायोगिक लसीची चाचणी करण्यात आली आहे. जीचे सुरूवातीचे निकाल अधिक प्रमाणात सकारात्मक आले आहेत.

या नवीन एचआयव्ही लसीची पहिली चाचणी अमेरिका आणि अफ्रिकेच्या काही भागात करण्यात आली. सुमारे १०८ निरोगी लोकांना ही लस देण्यात आली. या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लस एमआरएनए तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आली आहे. कोव्हिड-१९ व्हायरसची लस देखील याच तंत्रज्ञानाने तयार केली गेली होती. (vaccine) परंतु एचआयव्ही व्हायरसचे स्वरूप प्रत्येकवेळी वेगळे बदलत राहते. यासाठी लस अत्यंत प्रभावी असणे आवश्यक आहे.

एमआरएनए लस चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ८० टक्के लोकांमध्ये तटस्थ अँटीबॉडीज विकसित झाल्या, म्हणजेच ही लस रोगप्रतिकार शक्ती राखण्यासाठी प्रभावी ठरली. परंतु याचसोबत अनेक लोकांमध्ये त्वचेवर झालेला परिणाम दिसून आला. पहिल्या चाचणीनंतर ही लस किती सुरक्षित आहे हे समजले. पण या लसीने शरीरात तयार होणारे अँटीबॉडीज किती काळ टिकतील? ही लस एचआयव्ही संक्रमित लोाकंवर देखील सकारात्मक परिणाम करेल का? या प्रश्नांचे निकाल चाचणीच्या पुढील टप्प्यात समजतील.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एमआरएनए तंत्रज्ञान वापरून तयार केलेली ही लस एचआयव्हीशी लढण्यात समर्थ ठरू शकते. जर वैज्ञानिक लस चाचणीच्या येत्या टप्प्यात यशस्वी झाले तर, एचआयव्ही सारख्या अत्यंत गंभीर आजारावर मात करणे शक्य होईल. येत्या काही वर्षात ही लस बाजारात देखील उपलब्ध होईल. (vaccine) तरी सुद्धा तुम्ही एचआयव्हीच्या संक्रमणापासुन वाचण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष