रात्री झोपण्याआधी आहारात करा ‘या’ गुणकारी पदार्थाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल क्षणार्धात स्वच्छ

दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याला(health) हानी पोहचण्याची शक्यता असते. बिघडलेली जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.

गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यानंतर पोटाला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी फॉलो न करता शरीराला(health) पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. रात्रीच्या वेळी तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोटात जडपणा जाणवणे, पोट व्यवस्थित स्वच्छ न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.

पचनासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यासाठी रात्री झोपताना कोणत्या पदार्थाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थाचे सेवन केल्यामुळे पचनाची कोणतीही समस्या उद्भवत नाही आणि शरीराचे कार्य सुरळीत राहते. त्यामुळे जेवणानंतर नियमित बडीशेप खावी.

बडीशेप खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे:
बडीशेप खाल्यामुळे आरोग्याला(health) अनेक फायदे होतात. यामध्ये असलेल्या गुणकारी घटकांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होत नाहीत. बडीशेपमध्ये असलेले गॅस्ट्रिक एंझाईम्स शरीरातील अन्नपदार्थ पचनवण्यसाठी अतिशय गुणकारी ठरतो. रात्री झोपण्याआधी एक चमचा बडीशेप खाल्यास पचनसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. याशिवाय जेवल्यानंतर पोटात हलके वाटू लागते.

झोपेची गुणवत्ता सुधारते:
नियमित एक चमचा बडीशेप खाल्यास बिघडलेली झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. यामुळे तुम्हाला रात्रीच्या वेळी आरामदायी झोप लागेल. यामध्ये आढळून येणारे मॅग्नेशिअम स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी मदत करतात. शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे झोपेची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. त्यामुळे नियमित शांत आणि गाढ झोपेसाठी रात्री झोपण्याआधी बडीशेप खावी. बडीशेप खाल्यामुळे मन शांत राहते.

पोट स्वच्छ होते:
रात्री झोपण्याआधी बडीशेप खाल्यास सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होते. पोटासंबंधित किंवा पचनसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. जेवलेले अन्नपदार्थ आतड्यांमधून पुढे सरकवण्यासाठी बडीशेप अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे रात्री झोपताना नियमित बडीशेप खावी. पोट स्वच्छ झाल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :

शरद पवारांचा नरेंद्र मोदींना पाठिंबा, केलं मोठं वक्तव्य

दणक्यात झालं रोहित शर्माचं बर्थडे सेलिब्रेशन, मुंबई इंडियन्सने शेअर केला Video

इलेक्ट्रिक गाड्यांबाबत महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा