वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी ठराविक अंकराच्या कालावधीने राशी(astrology) परिवर्तन करतो. शनीचं एका राशीच्या नक्षत्रात जवळपास 1 वर्ष राहतो. तर, पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी शनीला तब्बल 27 वर्षांचा कालावधी लागतो. शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, आज वसंत पंचमीच्या दिवशी शनीने सकाळी 8 वाजून 51 मिनिटांनी पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश केला आहे. शनी गुरुच्या नक्षत्रात राहून काही राशींना(astrology) चांगला लाभ देणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी शनीचं गुरुच्या राशीत प्रवेश करणं अनुकूल ठरणार आहे. पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करुन शनी या राशीच्या अकराव्या चरणात असणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला धनलाभ मिळेल. या कालावधीत तुमचं वाहन घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तसेच, जुन्या मित्रांशी तुमच्या भेटीगाठी वाढतील. अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. त्यामुळे तुम्ही खुश असाल.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या काळात तुम्ही योजलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला अपार धनलाभ मिळेल. त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाला चांगली गती मिळेल. समाजात चांगला मान-सन्मान वाढलेला दिसेल. पैसे कमावण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर, तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. शनीची कृपादृष्टी तुमच्यावर असेल त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
कुंभ रास
पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करुन शनी लग्न चरणात असणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. तुमच्या करिअरला चांगली गती मिळेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. परदेशात जाण्याची संधीदेखील तुमच्यासमोर चालून येईल. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
वैज्ञानिकांचा धडकी भरवणारा इशारा; लाखो बळी जाणार, कारण वाचून हादरून जाल
भाजपचा ‘मास्टर प्लॅन’…, आयकरात सूट देऊन मध्यमवर्गीयांची जिंकली मने! आता…
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचा धिंगाणा; मोबाईल टॉवरवर चढला अन्… Video Viral