सोनारांन टोचलं आहेत कान! राखला जाणार काय मान?

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : महायुती मधील सर्वच मंत्र्यांचे पहिल्या तीन महिन्यातील कामकाजाचे प्रगती पुस्तक पाहून त्यांना
श्रेणी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील काहीना कडक समज देण्याची दुर्दैवाने वेळ आली आहे. आचरण चांगले ठेवा, तोंड सांभाळून बोला, सरकारला(political) अडचणीत आणू नका, सरकारने केलेल्या चांगल्या कामाबद्दल विरोधकांना प्रश्न विचारण्याची संधी देऊ नका, सरकारच्या चांगल्या कामावर पाणी फिरवू नका अशा आशयाची टिपणी करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील काही जणांना वर्तणुकीत बदल करण्याचे आवाहन केले आहे. एक प्रकारे त्यांनी संबंधितांचे कान टोचले आहेत पण त्यांचा मान राखला जाणार आहे काय? त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळणार काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त वक्तव्य करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. शेतकरी हा शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी काही करत नाही. विवाह समारंभावर तो पैसे उधळतो. भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही एक रुपयात पिक विमा काढतो आहे. शासन भिकारी आहे अशी वादग्रस्त विधाने कृषी मंत्र्यांनी वेळोवेळी केलेली आहेत. ते विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना विधानभवनात मोबाईलवर ऑनलाइन जंगली रमी खेळताना कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत.

रितेश राणे हे अल्पसंख्यांक समाजाला उद्देशून वादग्रस्त(political) वक्तव्य करत असतात. अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत अशी समज त्यांचे बंधू निलेश राणे तसेच पिताश्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वीच दिलेली आहे. प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, योगेश कदम, भरत गोगावले, यांनीही मंत्री म्हणून केलेली वक्तव्ये वादग्रस्त ठरलेली आहेत. त्यांनी वेळोवेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर चर्चेचा धुरळा उडाला होता. महायुतीच्या घटक पक्षातील भाजप, शिवसेना शिंदे गट, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मंत्र्यांचा वादग्रस्त वक्तव्य करण्यामध्ये सहभाग होता आणि आहे.

वास्तविक उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यांनी त्यांच्या मंत्र्यांना कठोर शब्दात समज देणे आवश्यक होते. डान्सबार बद्दल विरोधकांच्या रडारवर आलेले योगेश कदम, हॉटेल विट्स लिलाव प्रकरणात अडचणीत आलेले संजय शिरसाठ यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी योग्य ती कारवाई करणे आवश्यक होते. माणिकराव कोकाटे यांच्यावर तर अजितदादा पवार हे कठोर कारवाई करणार, त्यांचे खाते बदलणार किंवा मंत्रिमंडळातून वगळणार अशी चर्चा होती. प्रत्यक्षात या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालावे लागले.

एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांच्या गटातील काही मंत्र्यांमुळे भारतीय जनता पक्षाची नाहक बदनामी होते आहे याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या तरुण भारत मध्ये विशेष वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी वाचाळ वीर मंत्र्यांच्या बद्दल कडक समज देण्याची भूमिका घेतली आहे. पण त्याचबरोबर कोणत्याही मंत्र्यांची खाती बदलली जाणार नाहीत. कोणाही मंत्र्याला वगळले जाणार नाही हे सुद्धा आता स्पष्ट झाले आहे.

छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे यांना अजितदादा गटाच्या सुरज चव्हाण यांनी बेदम मारहाण केले होती. त्याबद्दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक जिल्ह्यात आंदोलन केले होते. विजय घाडगे यांनी अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सुरज चव्हाण तसेच माणिकराव कोकाटे यांच्या बद्दल तक्रार केली होती. कोकाटे यांना मंत्रिमंडळातून वगळले जाईल असे त्यांना वाटत होते. प्रत्यक्षात मात्र अजितदादा(political) यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे विजय घाडगे हे संतप्त झालेले आहेत. अजितदादा यांनी शब्द पाळला नाही याबद्दलही त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सौम्य भूमिकेबद्दल टीका केली आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड(political) यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांना केलेली बेदम मारहाण, त्यांनी मारहाणीचे केलेले समर्थन, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या डान्सबार वर पोलिसांनी केलेली कारवाई, भरत गोगावले यांचे होम हवन मंत्र तंत्र, नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग जवळ ठेवून धूम्रपान करणारे संजय शिरसाठ आदि मंडळींच्यामुळे महायुतीच्या सरकारची प्रतिमा काही प्रमाणात का होईना मलीन झाली होती.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांना केलेली बेदम मारहाण, त्यांनी मारहाणीचे केलेले समर्थन, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या डान्सबार वर पोलिसांनी केलेली कारवाई, भरत गोगावले यांचे होम हवन मंत्र तंत्र, नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग जवळ ठेवून धूम्रपान करणारे संजय शिरसाठ आदि मंडळींच्यामुळे महायुतीच्या सरकारची प्रतिमा काही प्रमाणात का होईना मलीन झाली होती.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील या गावात वसलंय जगातलं पहिलं भूमिज मंदिर; भगवान शिवाला समर्पित, पांडवांनी केली होती बांधणी
श्रावण महिन्यातील मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला मिळणार ३००० रुपये? जाणून घ्या सरकारचा मास्टर प्लॅन