इचलकरंजी, 29 ऑगस्ट 2024: माजी उपनगराध्यक्ष श्री. सुनील महाजन आणि शिवसेना कोल्हापूर(Grand) जिल्हा प्रमुख श्री. रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखालील ‘सुनील महाजन युवा शक्ती’ व ‘रवींद्र माने युथ फोर्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने राधाकृष्ण चौक, इचलकरंजी येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे दहीहंडी फोडणाऱ्या मंडळांना मिळणारे 1,51,001 रुपये रोख बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी.
या स्पर्धेत महिला मंडळांसाठीही विशेष व्यवस्था(Grand) करण्यात आली आहे. महिलांच्या तर्फे जे मंडळ दहीहंडी फोडतील, त्यांना 1,00,001 रुपये रोख बक्षीस आणि ट्रॉफी प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेची सुरुवात संध्याकाळी ठीक 5 वाजता होणार आहे. खास मुंबईहून महिला गोविंदा पथक (गोपिका) या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणार आहेत, जे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
या दहीहंडीच्या स्पर्धेसाठी हातकणंगले लोकसभेचे विद्यमान खासदार श्री. धैर्यशील माने, राज्यसभेचे खासदार श्री. धनंजय महाडिक, माजी आमदार श्री. सुरेश हाळवणकर, आणि इतर राजकीय, सामाजिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या आकर्षणात केशरी ढोल ताशा पथक, DJ साऊंड सिस्टीम, आकर्षक LED लाईट इफेक्ट्स आणि जोरदार आतिषबाजी यांचा समावेश असेल. सूत्रसंचालनासाठी पुण्याहून खास निमंत्रित दीप्ती हलवाई उपस्थित राहणार आहेत.
दहीहंडी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा अथायू हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने पुरवण्यात येणार आहे. संयोजकांच्या वतीने इचलकरंजी शहर आणि परिसरातील नागरिकांना या भव्य आणि आकर्षक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा:
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा दमदार पाउस, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले….
एअरटेल ग्राहकांना मोठा दिलासा; कंपनीने सुरू केली फ्री रिचार्जची सुविधा
इचलकरंजी न्याय संकुलाला मंत्रिमंडळ बैठकीतून मंजुरी, वकील समूहात आनंदाचे वातावरण