‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर पुन्हा शोषणाचे आरोप, ‘या’ अभिनेत्रीने सोडली मालिका

सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. बऱ्याच कलाकारांनी(actress) ही मालिका सोडली आहे. त्यांच्या जागी आता नवीन कलाकार आले आहेत. अशात प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री(actress) पलक सिधवानीने मालिका सोडण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासोबतच तिने शोषणाचे आरोप देखील केले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील एका अभिनेत्रीने असेच शोषणाचे आरोप केले होते.

मालिका सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पलक सिधवानीला निर्मात्यांनी कायदेशीर नोटिस पाठवली आहे. पलकने कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप नोटिसमध्ये करण्यात आला आहे. निर्मात्यांची लेखी परवानगी न घेता पलकने इतर ब्रँडसोबत काम केल्याने कराराचे उल्लंघन झाल्याचा आरोप नोटिसमध्ये करण्यात आला आहे.

यावर अभिनेत्री पलक सिधवानीने प्रतिक्रिया दिली आहे. मालिका सोडत असल्यामुळेच निर्माते अशा पद्धतीने कारवाई करत असल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत मोठा खुलासा केला आहे. मात्र, या सर्व प्रकरणामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

“मी 8 ऑगस्ट रोजीच मालिका सोडण्याच्या निर्णयाबाबत निर्मात्यांना कळवलं होतं. त्यांनी काही वेळ मागितला आणि त्यानंतर ते मला अधिकृतरित्या मेल पाठवणार होते. त्याच मेलवर मला राजीनाम्याचं पत्र लिहिण्यास त्यांनी सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी मला मेल पाठवलाच नाही. त्यांनी माझा राजीनामा स्वीकार केला नाही आणि त्याच्या काही दिवसांतच माध्यमांमध्ये माझ्याविरोधात बातम्या दिसून आल्या”, असं पलक सिधवानी म्हणाली आहे.

तसेच मी पाच वर्षांपूर्वी या मालिकेसोबत करार केला होता आणि त्यांनी मला त्याची कॉपीसुद्धा दिली नाही. त्यांनी मला इतर जाहिराती करण्यासाठी परवानगी दिली होती. आता मला मालिका सोडायची तर ते माझ्यावर असे आरोप करत आहेत. खरंतर हे एकप्रकारे शोषणच आहे, असा आरोप ‘सोनू’ उर्फ पलक सिधवानीने केला आहे.

हेही वाचा:

आचारसंहिता लागण्याआधी आरक्षण देणे शक्य आहे…?

लिलावाआधी मोठी अपडेट; ऋषभ पंतने RCB टीमशी साधला संपर्क?

‘महाराष्ट्राने अनेकांचा माज उतरवलाय, हिंमत असेल तर…’: राऊतांचे अमित शाहांना ओपन चॅलेंज

भाजपचा बडा नेता ठाकरेंच्या गळाला; दसऱ्यानंतर सीमोल्लंघन होणार