अंबरनाथ पालिकेच्या शाळा क्रमांक ९ मध्ये विद्यार्थ्यांना ओल आलेल्या भिंती,(environment) शाळेचा आवारात असलेला चिखल आणि कोंदट वातावरणात अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत.

अंबरनाथ पालिकेच्या शाळा क्रमांक ९ मध्ये विद्यार्थ्यांना ओल आलेल्या भिंती, शाळेचा आवारात असलेला चिखल आणि कोंदट वातावरणात अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत.(environment) गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या शाळेत शिकणारे हे विद्यार्थी दर पावसाळ्यात याच वातावरणात शिक्षण घेतात विद्यार्थ्यांना त्याच कोंदट वातावरणात शिकण्याची वेळ येते.
या शाळेच्या परिसरात चिखलाचं साम्राज्य असल्याने चिखल तुडवत विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागत आहे. शाळेच्या स्वच्छतागृहाची तर खूपच बिकट अवस्था आहे .स्वच्छतागृहात साचलेल्या पाण्यामधून वाट काढीत विद्यार्थ्यांना जावं लागतं. विद्यार्थिनींची तर यामुळे मोठी कुचंबाना होते,(environment) मात्र पालिका प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीबाबत काहीही घेणेदेणे नाही. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्या विद्यार्थ्यांना पालिकांच्या या कोंदट वातावरणातील शाळेत प्रवेश घेऊन शिकावं लागतं. मात्र त्याचाच गैरफायदा पालिका प्रशासन घेतय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
हेही वाचा :
पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर..
SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?
वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान