प्रवास करताना हॉटेलमध्ये चेक-इन करण्यासाठी ओळखपत्र सादर करणं ही नेहमीची प्रक्रिया आहे. (Aadhaar card) अनेक हॉटेलमध्ये ग्राहकांकडून आधारकार्डाची प्रत मागितली जाते. आधारची झेरॉक्स सोबत नसेल तर बाहेर जाऊन फोटोकॉपी काढून आणण्याची वेळही अनेकदा येते. मात्र, आता हॉटेल चेक-इनची ही प्रक्रिया अधिक डिजिटल आणि सोपी करण्याच्या दिशेने बदल होत असल्याची माहिती समोर आली आहे.

नव्या डिजिटल पद्धतीमध्ये प्रत्येक वेळी आधारकार्डाची फिजिकल कॉपी जमा करण्याची गरज कमी होऊ शकते. ओळख पडताळणीसाठी QR कोड, OTP आणि अॅपच्या माध्यमातून डिजिटल व्हेरिफिकेशन यांसारख्या पर्यायांचा वापर केला जाऊ शकतो. (Aadhaar card) त्यामुळे प्रवाशांना कागदपत्रांच्या प्रती घेऊन जाण्याची किंवा त्या जपून ठेवण्याची कटकट कमी होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत QR कोडच्या माध्यमातून ओळख पडताळणी केली जाऊ शकते. हॉटेलमध्ये चेक-इन करताना ग्राहकाला अधिकृत डिजिटल माध्यमातून उपलब्ध असलेला QR कोड दाखवण्यास सांगितलं जाऊ शकतं. संबंधित प्रणालीद्वारे माहितीची पडताळणी झाल्यानंतर चेक-इन प्रक्रिया पुढे नेता येईल.
याशिवाय OTP आधारित व्हेरिफिकेशनचाही पर्याय वापरला जाऊ शकतो. ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवून त्याची ओळख पडताळली जाऊ शकते. डिजिटल व्यवहार आणि विविध ऑनलाइन सेवांमध्ये ज्या पद्धतीने OTPच्या माध्यमातून पडताळणी केली जाते, त्याच धर्तीवर ही प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.या बदलामागे केवळ चेक-इनचा वेळ कमी करणं हा उद्देश नसून वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेलाही महत्त्व दिलं जात आहे. आधारकार्डाच्या फिजिकल कॉपीमध्ये नाव, पत्ता आणि इतर संवेदनशील ओळखविषयक माहिती असते. ही प्रत दीर्घकाळ एखाद्या संस्थेकडे साठवून ठेवल्यास वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. डिजिटल पडताळणीमुळे अशा कागदी प्रतींचा वापर कमी करण्यास मदत होऊ शकते.
प्रवाशांच्या दृष्टीने पाहिलं तर डिजिटल चेक-इनमुळे ओळख पडताळणीसाठी लागणारा वेळ कमी होऊ शकतो. आधारची झेरॉक्स सोबत ठेवण्याची गरज कमी होईल आणि कागदपत्रांच्या प्रती हाताळण्याचा त्रासही टाळता येईल. मात्र, कोणत्या हॉटेलमध्ये कोणती डिजिटल पडताळणी पद्धत उपलब्ध आहे, हे संबंधित हॉटेलच्या प्रक्रियेनुसार बदलू शकतं. (Aadhaar card) त्यामुळे पुढील काळात हॉटेलमध्ये चेक-इन करताना कागदी कागदपत्रांऐवजी डिजिटल पद्धतीने ओळख पडताळणी करण्याचा पर्याय प्रवाशांसाठी अधिक सोयीचा ठरू शकतो. प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित हॉटेलची चेक-इन प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासणं मात्र महत्त्वाचं राहणार आहे.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?