सध्या पाकिस्तानमधील सिंहाची बरीच चर्चा सुरु आहे. गेल्या आठवड्यात २ जुलै(lions) रोजी एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. एका पाळीव सिंहाने महिला आणि दोन चिमुकल्यांवर हल्ला केला आहे.

इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानमधील सिंहाची बरीच चर्चा सुरु आहे. गेल्या आठवड्यात २ जुलै रोजी एक मोठी धक्कादायक घटना घडली. ज्यामध्ये एका पाळीव सिंहाने एका महिलेवर आणि दोन लहान(lions) चिमुकल्यांवर हल्ला केला. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये सिंहाची दहशत परसली आहे. याअंतर्गत पोलिसांनी पाळीव सिंहाच्या मालकाला अटक केली आहे. शिवाय अद्याप कारवाई सुरुच आहे. यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.
सध्या पंजाब पोलिसांनी सिंहाला पाळणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. केवळ पंजाब प्रांतातून १० हून अधिक पाळीव सिंहाची सुटका करण्यात आली आहे. या सिंहान बेकायदेशीरपणे(lions) खरेदी करण्यात आले होते. तसेच लाहोरमध्ये घडलेल्या सिंहाच्या महिला आणि चिमुकल्यांवरील हल्ल्यात सिंहाच्या मालकाला देखील अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानमध्ये सिंह पाळणे सामान्य बाब
परंतु पाकिस्तानमध्ये सिंह पाळणे ही एक अभिमानाची आणि सामान्य बाब बनत चालली आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये ३ हजारांहून अधिक लोक सिंहाला पाळत आहेत. लाहोर, कराची आणि इस्लामाबाद यांसारख्या पाकिस्तानच्या मोठ्या शहरांमध्ये सिंहाना पाळण्याची संख्या वाढत आहे. अनेक लोक सिंह, वाघ यांसारखे हिंसक प्राणी बेकायदेशीरपणे खरेदी करत आहेत.
पाकिस्तानमध्ये सिंह पाळण्याचे नियम
पाकिस्तानमध्ये सिंह, वाघ यांसारखे हिंसक आणि वन्य प्राणी पाळायचे असतील तर यासाठी का नियम लागू करण्यात आले आहेत. यासाठी लोकांना अधिकृत परवान्याची आवश्यकता आहे. तसेच सिंह, वाघ असे प्राणी पाळणाऱ्या मालकांना सर्व कायदे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. परंतु सध्या पाकिस्तानमध्ये विना परवाना बेकायदेशीरपणे सिंहाची खरेदी केली जाक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये सुमारे ८ हजार पाळीव सिंह आहेत.
पाकिस्तानमध्ये सिंहाची किंमत
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सिंहाच्या पिल्लांची बेधडकपणे विक्री केली जाते. AFPच्या वृत्तानुसार, २०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सिंहाच्या पिल्लांची खरेदी करण्यात आली होती. या अहवलानुसार, पाकिस्तानमध्ये एका सिंहाच्या पिल्लाची किंमत २५०० डॉलर्स म्हणजे सुमारे २ लाख रुपये आहे.
पाकिस्तानमध्ये सिंहाची घरपोच डिलिव्हरी केली जाते. एखाद्या पाकिस्ताननीने सिंह खरेदी केल्यावर एक दलाल त्याच्या घरापर्यंत सिंहाची डिलिव्हरी करतो. पाकिस्तानी लोक अगदी अभिमानाने आणि कोणतीही भिती न बाळगता सिंहाला घरात ठेवतात. पाकिस्तानमध्ये सिंह पाळणे हे वैभव आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते.
सिंहापेक्षा म्हशीची किंमक जास्त
शिवाय येथे सिंहाची किंमत म्हशीपेक्षा कमी आहे. लाहोरच्या प्राणीसंग्रहायातही सिंहाची विक्री केली जाते. येथे प्राणीसंग्रहालयात सिंहाचे पिल्लू २ वर्षांचे झाल्यावर विकले जाते. याची किंमच सुमारे दीड लाख आहे. तर लाहोरमध्ये एका म्हशीची किंमत ३ लाख रुपये आहे.
हेही वाचा :
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर
धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video
‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं