इचलकरंजीच्या(Ichalkaranji) जुना चंदुर रोडवरील तणंगे मळा परिसरात बुधवारी रात्री ११ वाजता गवा रेडा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दुर्गा माता मंदिराजवळ प्रथम रेडा दिसून आला, त्यानंतर तो पाटील मळा, शेळके मळा, बागवान पट्टी आणि तणंगे परिसरात वावरताना दिसला.

गवा रेड्याच्या शोधासाठी कोल्हापूर वन विभागाचे पथक ड्रोनच्या मदतीने शोध घेत होते. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संजय कांबळे यांना माहिती मिळाल्यानंतर त्वरित पथक घटनास्थळी दाखल झाले. हातकणंगले आणि कोल्हापूर येथून वनविभागाची तुकडी आली होती.
काही युवकांनी मोटरसायकलवरून पाठलाग केल्याचेही निदर्शनास आले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या गाडीवरील प्रकाश आणि ड्रोन द्वारे शोध घेण्यात आला, मात्र गवा रेडा सापडला नाही.
गवा रेड्याच्या आगमनाची खबर मोबाईलद्वारे परिसरात पोहोचवल्याने नागरिक सतर्क राहिले आणि कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी कोरोची परिसरात देखील गवा रेडा आढळून आला होता, आणि इचलकरंजीत (Ichalkaranji) दिसलेला रेडा हाच असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
वन्यप्राण्यांना चिथावू न देता तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. सुरक्षितता पाळा आणि मदत कार्यात सहकार्य करा असे आव्हान वन विभागाने केले आहे.
हेही वाचा :
‘ही’ आहे भारतातील नंबर 1 दारू, अंतिम व्हिडीओ पटकावला मानाचा किताब