मुहूर्त ठरला! ‘Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2’ प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज, वेळ अन् तारीख काय?

टिव्हीची लोकप्रिय मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आता पुन्हा(ready) एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. याचा भन्नाट प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मध्ये अभिनेत्री स्मृती इराणी या मुख्य भूमिकेत होत्या. त्यांना या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्यांनी मालिकेत ‘तुलसी विरानी’ ही भूमिका साकारली होती.(ready) ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’च्या प्रोमोमध्ये स्मृती इराणी यांना पाहून चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला आहे.

एक कुटुंब हॉटेलमध्ये ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेची चर्चा करताना दिसत आहे. त्यानंतर स्मृती इराणी यांची धमाकेदार एन्ट्री होते. त्या म्हणतात की, “मी पुन्हा आले आहे. (ready)प्रेक्षकांसोबत माझे 25 वर्षांपासून घट्ट नातं आहे.”

रिलीज डेट काय?
‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी खूप आतुर असल्याचे दिसून येत आहे. मालिका 29 जुलै पासून रात्री 10:30 वाजता ‘स्टार प्लस’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. तर जिओ हॉटस्टारवर देखील तुम्ही मालिका पाहू शकता.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा टीआरपी देखील कायम टॉपवर राहीला होता. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने 2008ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता 25 वर्षानंतर तुलसी प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर

धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video

‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं