कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगरच्या तिसगाव गावा नजीकच्या खिवड्या नामक डोंगरावर दोन-तीन दिवसापूर्वी घडलेली घटना ही चांदगुडे कुटुंबाची शोकांतिका आहे, पण ती एका कुटुंबाशी मर्यादित सुद्धा नाही. थोड्याफार फरकाने ती “हर घर की कहानी” आहे. संपूर्ण समाजाच्या मानसिकतेचा ते विच्छेदन आहे. समाजाच्या कोसळलेपणाची ती दारुण कथा आहे. म्हणूनच त्यातून बाहेर पडण्याची जबाबदारी समाजाचीच आहे. एकीकडे जेन झी च्या कल्लोळाची चर्चा देशभर सुरू आहे. तर कुठे छात्रों की गुंज ऐकली, ऐकवली जात आहे. पण आज खरी गरज आहे ती कोलमडलेली कुटुंब संस्था पूर्ववत करण्याची. या कोलमडलेल्या कुटुंब व्यवस्थेतून बहुतांशी घरात कुणीतरी”कुणाल”आहे. त्या हजारो “कुणालां” चे मानसिक व्यवस्थापन केले पाहिजे.

खिवड्या डोंगर किंवा तो भयानक तासलेला असलेला कडा हा मानवनिर्मित आहे. या कड्यावरून खोल दरीत स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केल्याच्या 13 घटना यापूर्वी तिथे घडलेल्या आहेत. (Khivdya) वास्तविक तेथे कोणी जाऊच नये किंवा गेलेच तर खाली दरीत उडी मारून आत्महत्या करता येऊ नये अशी सुरक्षा व्यवस्था तिथे असायला हवी होती. गौण खणी कर्म विभागाची ती जबाबदारी आहे. दगड काढण्यासाठी उभा डोंगर तासून काढला जातो. असे तासलेले कडे प्रत्येक जिल्ह्यात आहेत. तिथे सुरक्षित कठडे किंवा लोखंडी गर्डल्स लावले गेलेले नाहीत. तिसगाव परिसरातील तासलेला खिवड्या डोंगर पहिला की छातीत धडकी भरते. चांदुगडे कुटुंबाची शोकांतिका घडल्यानंतर उभ्या महाराष्ट्राने हा तासलेला भयानक कडा पाहिलेला आहे.
खिवड्या डोंगरच्या कड्यावर कोणाला चांडूकडे उभा आहे, तो वारंवार कड्यावरून उडी मारण्याची धमकी देतो आहे, आयफोन घेतल्यानंतरचे त्याचे हप्ते थकलेले आहेत, ते त्याच्या वडिलांनी भरलेले नाहीत, म्हणून सतरा अठरा वर्षांचा कुणाल डिप्रेशन मध्ये गेला आहे. त्याचेही कड्यावरचे भयनाट्य तीन तास सुरू होते. मृत्यू रेषेवर उभा असलेल्या आपल्या मुलाला त्याचे वडील मुरलीधर हे मागे फिर अशी विनवणी करत आहेत. त्याची आई संगीता ही त्याची समजूत काढत आहे. तिसगाव चे सरपंच मी गावचा सरपंच असून साधा बटनाचा मोबाईल वापरतो आहे, तू मागे येअसे आवाहन करत आहेत. पण कुणाल कुणाचेच ऐकण्याच्या मानसिक स्थितीत नाही.
वडील अगदी सावधपणे त्याच्याकडे त्याला पकडण्यासाठी गेले आणि कुणाल खोलदरीत कोसळला आणि पाठोपाठ त्याचे वडीलही कोसळले. हे भय चकित करणारे दृश्य पाहून भांबावलेली कुणालची आई संगीता यांनी सैरभैर होऊन स्वतःला दरीत झोकून दिले. खाली रक्ताच्या थारोळ्यात चांदुगडे कुटुंब निपचिप पडले होते. या भयाण घटनेचे साक्षीदार बनलेल्या सर्वांचेच काळीज थरारून गेले असेल.वडिलांनी आयफोन दिला नाही, किंवा तो कर्जाच्या माध्यमातून घेऊन दिला पण कर्जाचे हप्ते वडील भरू शकत नाहीत म्हणून कुणाल याने हे टोकाचे पाऊल उचलले असे प्रथमदर्शनी समजून येते, पण ही शोकांतिका घडून गेल्यानंतर ह्या घटनेमागचे काही कंगोरे नातेवाईकांच्याकडून पुढे आणले जात आहेत. (Khivdya) त्यातून कुणाल च्या आई-वडिलांमध्ये काही मतभेद होते. घरातील हे ताण तणाव कुणाल याला सहन झालेले नाहीत किंवा सहन होत नव्हते असे एक चित्र पुढे आणले जात आहे. कुणालच्या आईचा एक व्हिडिओ सुद्धा या घटनेनंतर व्हायरल केला जातो आहे.
आय फोन वापरण्याचे कुणाल याचे वय नव्हते आणि नाही. त्याच्या घरची आर्थिक स्थिती सुद्धा दीड दोन लाख रुपयांचा आयफोन खरेदी करण्याइतकी नव्हती. तरीही तो दिला होता का आणि दिला असेल तर त्याने आत्महत्या करण्याची धमकी का दिली? हे सर्व प्रश्न सकृत दर्शनी पुढे आलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधतील. त्यानंतर कायदेशीर तरतुदी वापरून हा गुन्हा फाईल बंद केला जाईल. या घटनेतून पोलीस काही दिवसांनी अलिप्त होतील पण समाजाला अलिप्त होता येईल का? कुणाल चांदगुडे याचा कुणालाही संताप यावा असा अट्टहास, चांदगुडे पती-पत्नी मधील दुरावा किंवा त्यांच्यामध्ये असलेला विसंवाद, ही दोन प्रमुख कारणे या शोकांतिके मागे लपलेली आहेत.
कुणाल हा त्याची आई संगीता हिची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Khivdya) याचा अर्थ तो मातृभक्त होता पण तरीही त्यादिवशी तो आईचे सुद्धा ऐकण्याच्या मानसिक स्थितीत नव्हता. हे आकलनाच्या पलीकडचे आहे.एकूणच तिसगाव परिसरात घडलेली शोकांतिका ही चांदगुडे कुटुंबा पुरती मर्यादित असली तरी समाजाचे उत्तरदायित्व काही कमी होत नाही. ही समाजाच्या कोसळलेपणाची समस्या आहे आणि या समस्येवरचे समाधान समाजानेच शोधावयाचे आहे. जेन झी च्या कल्लोळात तिसगाव प्रकरण लुप्त होता कामा नये
हेही वाचा :
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या?
शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद मोंदीच्या मंत्रिमंडळात थेट विधानाने चर्चेला उधाण?
शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय घडलं पार्थ पवार काय म्हणाले अखेर बातमी आली समोर?