सध्या पावसाळा सुरु झाला असून धबधब्यांना(waterfall) ओसांडून पाणी वाहत आहे. या दृश्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आपल्या मित्रांसोबत, परिवारासोबत डोंगराळ भागात, धरणावर फिरायला जातात. परंतु अशा आंनदाच्या काळात धबधबे, डोंगर, धरणे अशा भागात आपल्या सुरक्षेची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे असते. परंतु अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमावून बसतात.

पर्यटनाच्या ठिकाणी फिरायला गेल्यावर आपल्या सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा लोकांना त्यांचा निष्काळजीपण नडतो. अलीकडेच्या काळात तर रील बनवण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, अनेकजण या नादात धोकादायक ठिकाणी जाऊन रिल बनवण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे सुरक्षेची काळजी न घेतल्याने गंभीर दुखापत होण्याची देखील शक्यता असते.
सध्या असाच एक थरराक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दोन तरुणी डोंगराळ भागात गेल्या असून धबधब्यावर(waterfall) रील बनवत आहे. परंतु धोकादायक ठिकामी रील बनवणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, डोंगराळ भागात काही तरुणी फिरायला गेल्या आहेत. तिथेच एका धबधब्याच्या(waterfall) ठिकाणी अगदी कठावर व्हिडिओ बनवण्यासाठी जात आहे. याच वेळी पहिल्या तरुणीचा ओल्या दगडांमुळे पाय घसरतो आणि ती जोरात आदळते, तरीही दुसरी तरुणी देखील पुढे जाण्याचा प्रयत्न करते.
मात्र ती देखील डोक्यावर जोरात पडते. दृश्यावरुन दिसत आहे की, दोन्ही तरुणी एका उंच दरीच्या टोकावर उभ्या आहेत दोन्ही तरुणी सुदैवाने दरीत पडत नाही, नाहीतर गंभीर दुर्घटना घडली असती. या घटनेचा व्हिडिओ तिथेच असलेल्या एका तिसऱ्या व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे.
पापा की परी एग्जाम समझ के कॉपी कर ली pic.twitter.com/n5XP48pW0y
— Reetesh Pal (@PalsSkit) June 15, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @PalsSkit या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने रीलचा नाद! असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने बाकी सगळं ठीक आहे, पण कोणती दुर्घटना नाही झाली ते चांगले झाले असे म्हटले आहे. आणखी एका युजरने पप्पांच्या परीला नक्कीच जोरात लागले असणार असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा :
तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? मध्य पूर्वेतील तांडव, होरपळ
कोल्हापुरात काँग्रेसला भगदाड; 35 जण शिंदे सेनेच्या गळाला
महिलेचं तोंड दाबून गळ्यातले दागिने ओरबाडले, पतीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार