‘ही’ आहे भारतातील नंबर 1 दारू, अंतिम व्हिडीओ पटकावला मानाचा किताब

तळीरामांसाठी खास बातमी आहे. आतापर्यंत सिंगल माल्ट व्हिस्की श्रेणीत(liquor) इंद्री ही भारतातील अव्वल क्रमांकाची दारू होती, मात्र आता इंद्रीने पहिला क्रमांक गमावला आहे. आता नंबर वनचा मुकुट नवीन सिंगल माल्ट ज्ञानचंद अदंबर व्हिस्कीने पटकावला आहे. अलीकडेच लास वेगासमध्ये आंतरराष्ट्रीय व्हिस्की स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात देवांस मॉडर्न ब्रुअरीज कंपनीच्या नवीन सिंगल माल्ट ज्ञानचंद अदंबर व्हिस्कीने भारतीय सिंगल माल्ट व्हिस्की आणि सर्वोत्कृष्ट भारतीय व्हिस्की या दोन्हीचे विजेतेपद पटकावले आहे.

ज्ञानचंद अदंबरने पटकावलेला दुहेरी मुकुट जम्मूच्यादेवांस मॉडर्न ब्रुअरीजसाठी एक मोठी उपलब्धी आहे. ही व्हिस्की वेगाने मद्य बाजारपेठेत आपली व्याप्ती वाढवत आहे. देवांस मॉडर्न ब्रुअरीजचे अध्यक्ष प्रेम दिवाण याबाबत बोलताना म्हणाले की, ‘हा सन्मान आमचे पारंपारिक कौशल्य आणि नवीन चवीचे महत्व अधोरेखित करत आहे. ज्ञानचंद अदंबर आमच्या कठोर परिश्रमाला एक नवीन रूप देत आहे.आयडब्ल्यूसी ही जगातील सर्वात प्रतिष्ठित व्हिस्की स्पर्धा आहे. (liquor) यात ब्लाइंड टेस्टिंगद्वारे व्हिस्कीचा दर्जा ठरवला जातो. अदंबर एक नॉन-पीटेड सिंगल माल्ट आहे जो अमेरिकन एक्स-बॉर्बन डब्यांमध्ये तयार केला गेला आहे. यात वाळलेली जर्दाळू, मध, टोस्ट केलेले मसाले आणि कॅरॅमलचा समावेश असतो, त्यामुळे या व्हिस्कीला परीक्षकांकडून चांगले गुण मिळाले आहेत.

प्रसिद्ध व्हिस्की समीक्षक जिम मरे यांनी म्हटले की, ‘मी ही व्हिस्की टेस्ट करुन मोहित झालो आहे. स्कॉटिश माल्टचा अनुभव देणारी ही आतापर्यंतची सर्वोत्तम भारतीय व्हिस्की आहे. (liquor) सिंगल माल्ट प्रेमींसाठी ही खरोखरच खास व्हिस्की आहे. पहिल्यांदा टेस्ट केल्यानंतर मला ही खरोखरच भारतीय व्हिस्की असू शकते का? असा प्रश्न पडला होता.

आदंबर ही व्हिस्की ज्ञानचंद इंडियन सिंगल माल्टचे नवे व्हर्जन आहे, याआधी ज्ञानचंद इंडियन सिंगल माल्टला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला होता. सध्या आदंबर फक्त दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांच्या ड्युटी-फ्री स्टोअरमध्ये उपलब्ध आहे, आगामी काळात कंपनी किरकोळ बाजारातही ही व्हिस्की लाँच करण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे.कंपनीचे संस्थापक दिवंगत ज्ञानचंद यांच्या नावावर असलेली ज्ञानचंद सीरिजमधील व्हिस्की जम्मूमध्येच डिस्टिल्ड, मॅच्युअर आणि पॅक केली जाते. हा व्हिस्की भारतीय व्हिस्की परंपरेची ही आधुनिक आवृत्ती असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

गणेशोत्सवाची सजावट बोंबलली? राज्यात कृत्रिम, प्लास्टिक फुलांवर बंदी

‘तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही, मग तुमचा…’; ‘प्राडा’ची टीम कोल्हापुरात असतानाच HC चा दणका

कोल्हापुरात पावसाची दमदार बॅटिंग; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अनेक धरणेही भरली