जीएसीएम टेक्नॉलॉजीजचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आहे.(news) जीएसीएम टेक्नॉलॉजीजने एक किंवा अधिक सेगमेंटमध्ये 200 कोटी रुपयांचे क्वालिफाइड इंस्ट्रुमेंटल प्लेसमेंट जारी करण्याची योजना जाहीर केल्यानंतर चर्चेत आले आहेत. या महत्त्वाच्या अपडेटनंतर या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढू शकतो आणि या शेअरमध्ये हालचाल पाहायला मिळू शकते. येत्या काही दिवसांत या शेअरमध्ये उच्च ट्रेडिंग वॉल्यूम दिसू शकतो. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

शेअर बाजारातील चढ-उतार आणि निर्देशांकाच्या हालचालींबरोबरच पेनी शेअर्सचेही विश्व आहे. हे पेनी शेअर्स एकीकडे झटपट नफा देत असतील तर दुसरीकडे त्यांनाही तेवढाच धोका असतो. टेक क्षेत्रातील जीएसीएम टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीच्या शेअरची किंमत एक रुपयापेक्षा ही कमी आहे.(news) गेल्या सहा महिन्यांपासून हा शेअर 75 पैसे ते 90 पैशांच्या दरम्यान व्यवहार करत होता, पण आता या कंपनीतील बिझनेसबाबत बातमी समोर आली आहे. ज्याचा परिणाम या पेनी स्टॉकवर होऊ शकतो.
जीएसीएम टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा शेअर बुधवारी 0.90 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 100 कोटी रुपये आहे. बुधवारी बीएसईवर 1,21,90,902 शेअर्सचे व्यवहार झाले, जे पूर्णपणे डिलिव्हरीमध्ये गेले. 1.21 कोटी शेअर्सचा व्यवहार हा मोठा वॉल्यूम आहे, जो शेअरमध्ये दिसून आला.(news)जीएसीएम टेक्नॉलॉजीजने एक किंवा अधिक सेगमेंटमध्ये 200 कोटी रुपयांचे क्वालिफाइड इंस्ट्रुमेंटल प्लेसमेंट क्यूआयपी जारी करण्याची योजना जाहीर केल्यानंतर कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आहे.कंपनीने AI-संचालित एडटेक आणि एज्युकेशन डेटा कंपनी वेक्सल एज्यु प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 30 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी निश्चित करार केला आहे. या कराराची किंमत 500 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे.

तेलंगणातील फायनान्स टेक आणि फायनान्स कन्सल्टिंग कंपनी जीएसीएम टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक 9 जुलै 2025 रोजी होणार आहे, ज्यामध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट क्यूआयपी द्वारे 200 कोटी रुपयांपर्यंतच्या सिक्युरिटीज ची निर्मिती, ऑफर, निर्गम आणि वाटप केले जाणार आहे.या महत्त्वाच्या अपडेटनंतर या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढू शकतो आणि या शेअरमध्ये हालचाल पाहायला मिळू शकते. येत्या काही दिवसांत या शेअरमध्ये उच्च ट्रेडिंग वॉल्यूम दिसू शकतो.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय