आज शुक्रवार, 25 जुलै रोजी श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. (time)त्याचसोबत आज पहिला श्रावणी शुक्रवार असल्याने या दिवशी जिवतीची देखील पूजा केली जाते. जिवतीची पूजा करण्याची योग्य पद्धत काय आहे, जाणून घ्या

श्रावण महिन्याची सुरुवात आजपासून होत आहे. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात महादेवांसोबत जिवतीची देखील पूजा केली जाते. जिवतीला (time)जिवंतिका असे देखील म्हटले जाते. या दिवशी श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते. ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते.
श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक वाराला विशेष असे महत्त्व असते. श्रावण सोमवार, मंगळवार या दिवशी मंगळागौर साजरी केली जाते. तसेच शुक्रवारचा दिवस जिवतीची पूजा करण्यासाठी समर्पित असल्याचे मानले जाते. मान्यतेनुसार ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते. यावेळी जिवतीच्या पूजेसह कुलदेवी (time)आणि देवी लक्ष्मी विशेष पूजा करण्यात येते. श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा कशी केली जाते? काय आहे यामागील विधी जाणून घ्या
यावेळी किती श्रावणी शुक्रवार आहेत
मान्यतेसह श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवार हा महादेवासह जिवतीला समर्पित आहे. आजपासून श्रावण सुरु होत असून आज पहिला श्रावणी शुक्रवार देखील आहे, तर दुसरा श्रावणी शुक्रवार 1 ऑगस्टला आहे, तिसरा श्रावणी शुक्रवार 8 ऑगस्टला आहे, तिसरा श्रावणी शुक्रवार, 15 ऑगस्टला आहे तर शेवटचा श्रावणी शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी आहे. या सर्व शुक्रवारच्या दिवशी जिवतीची विधीवत पूजा करुन तिला नैवेद्य दाखविला जातो. श्रावण महिन्यात जिवतीची पूजा कशी करावी आणि काय आहे तिचे महत्त्व.
जिवतीची पूजा करण्याची पद्धत
श्रावणी शुक्रवारी कुलदेवी आणि देवी लक्ष्मीसह जिवतीची पूजा करावी. यामध्ये फुले, आघाडा व दुर्वा या गोष्टी एकत्र करून केलेली माळ, हळदीकुंकू लावलेले 21 मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र, गंध, हळदीकुंकू, तांदूळ लावून जिवतीची पूजा केली जाते.
त्याचसोबत पुरणाचे 5 – 7 किंवा 9 असे दिवे करून लक्ष्मीमातेची व जिवतीची आरती म्हटली जाते. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळे ठेवून दुध-साखर आणि चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो.
जिवतीची पूजा झाल्यानंतर तिचे औक्षण करुन आरती म्हटल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते. त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.
काय आहे जिवतीची कथा
पौराणिक कथेमध्ये उल्लेख केल्यानुसार, मूळची राक्षसी असणारी जरा मगध देशात राहात होती. त्यावेळी मगधच्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाला. त्यामुळे जन्मताच त्याला राज्याबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी जरा राक्षसीनीने त्या बाळाचे दोन वेगवेगळे भाग एकत्र करुन त्या बाळाला पुन्हा जीवदान दिले. म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले. यानंतर मगध राज्यात जरा राक्षसीनीचा महोत्सव केला गेला. तिला तेथील लोक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. जिवंतिका पूजनामुळे घरात, आरोग्य, धन, सुख लाभते अशी मान्यता आहे.
श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा करण्याचे महत्त्व
जिवतीची पूजा करतेवेळी जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनी। रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते।। हा श्लोक म्हटला जातो. श्रावणात येणाऱ्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. जिवतीची ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आई करते. श्रावण महिन्याची सुरुवात होताच देव्हाऱ्याजवळ किंवा एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर जिवतीचे चित्र किंवा फोटो लावला जातो. याची दर शुक्रवारी पूजा केली जाते आणि देवीला नैवेद्य दाखवला जातो
हेही वाचा :
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये का वाढतो पायांच्या गँगरीनचा धोका? जाणून घ्या लक्षणे आणि पाय स्वच्छ ठेवण्यासाठी उपायआजपासून श्रावणाची जबरदस्त सुरूवात, राशी ठरणार भाग्यशाली! भोलेनाथाचा आशीर्वाद, आजचे राशीभविष्य वाचा
भारताच्या पोरी इतिहास रचणार! FIDE बुद्धिबळ वर्ल्ड कप फायनलमध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख आमने-सामने, विजेत्याला मिळणार इतके पैसे