इचलकरंजी – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रियदर्शन कॉलनी(Colony), लायकर टॉकीज परिसरात गंभीर प्रकार घडला आहे. भर पावसाळ्यात गटारी करण्यासाठी उकरून ठेवलेल्या चरीमुळे आज सकाळी एका चारचाकी गाडीवर झाड कोसळले. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून वाहनचालकांसाठी ही घटना धक्का देणारी ठरली आहे.
घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. झाड कोसळले तेव्हा सुदैवाने गाडीत कोणीही नव्हते(Colony), अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. स्थानिक रहिवाशांनी तातडीने प्रशासनाला आणि पोलिसांना माहिती दिली.
प्रश्न असा उपस्थित होतो की, गटारी होत होती की ओढाच निर्माण केला जात होता? कारण, काम सुरू असतानाच सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न घेता मोठ्या प्रमाणावर चरी उकरून ठेवण्यात आल्या आहेत. ना कोठे झाडांची छाटणी, ना तात्पुरत्या अडथळ्यांची व्यवस्था. परिणामी, पावसाच्या पाण्यामुळे माती खचून झाडांची मुळे उघडी पडली आणि झाड थेट गाडीवर कोसळले.
रहिवाशांनी पीडब्ल्यूडी विभाग आणि मक्तेदारावर संताप व्यक्त केला असून, संबंधित मक्तेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. “काम करून घेणं ठीक आहे, पण त्यात नागरिकांचा जीव धोक्यात घालणं कदापि मान्य नाही,” असे स्थानिक नागरिकांनी ठणकावून सांगितले. या घटनेनंतर प्रशासनाला जाग येईल का, आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांमध्ये सुरक्षा यंत्रणा काटेकोरपणे पाळली जाईल का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हेही वाचा :