अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्रा गेल्या 5 वर्षांपासून पॉर्नोग्राफी प्रकरणात(husband) निकालाच्या प्रतिक्षेत आहे. पण अद्यापही पॉर्नोग्राफी कोणताच निर्णय कोर्टाने सुनावलेला नाही. अशात राज स्पष्ट म्हणाला आहे की, ‘जर मी दोषी असेल तर, मी शिक्षा भोगण्यास तयार आहे.’ एवढंच नाही तर, मी मरण्यासाठी देखील तयार आहे… असं राज कुंद्रा म्हणालेला आहे. सांगायचं झालं तर, पाच वर्षांपूर्वी मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून राज अश्लील व्हिडीओ अपलोड करायचा.. असे आरोप त्याच्यावर आहेत. यामुळे राज याला अटक देखील करण्यात आलेली. शिवाय तब्बल 63 दिवस त्याने तुरुंगवास भोगला आहे.

जर मी काही चुकीचं केलं असेल, तर मला शिक्षा द्या – राज कुंद्रा
राज कुंद्रा याने हे प्रकरण (husband) मार्गी लागावं यावर अधिक भर दिला. राज म्हणाला, “सर्व आरोपींपैकी मी एकमेव असा व्यक्ती आहे जो म्हणतोय की, जर मी काही चुकीचं केलं असेल तर मला शिक्षा द्या. या प्रकरणाचा एकदाचा कायमचा निकाल लावा. पण जर मी काहीही चुकीचं केलं नसेल, तर मला ‘क्लीन चिट’ द्या. मी गेल्या पाच वर्षांपासून या प्रकरणाचा सामना करत आहे. आजही मी ठामपणे सांगतो की, जर मी दोषी आढळलो, तर मी स्वतःचं आयुष्य संपवायलाही तयार आहे.”
बंद झाले सर्व व्यवसाय…
आयु्ष्यातील कठीण काळ आठवत राज कुंद्रा याने मोठी कबुली दिली. अटकेनंतर त्याने सर्व व्यवसाय बंद (husband) केलेले. ‘वाईट काळात मी आणि शिल्पाने आमचे सर्व व्यवसाय बंद केरण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्स, मिक्स्ड मार्शल आर्ट्स यांसरख्या सेक्टरमध्ये आमची गुंतवणूक होता. आम्ही एक होम शॉपिंग सेंटर सुरु केलं होतं आणि मुलाच्या नावाने एक टेक्नोलॉजी कंपनी, वियान इंडस्ट्रीज देखील सुरु केलेली. जवळपास 4 हजार लोकं यातून आपल्या गरजा भागवत होते.’
ते माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस होते – राज कुंद्रा
अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला (husband) असूनही, राज कुंद्रा याला तुरुंगात घालवलेले 63 दिवस आयुष्यातून पुसून टाकायचे नाहीत. “आर्थर रोड तुरुंगातील ते 63 दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस होते. परिस्थिती अशी होती की, मला पुढची सकाळ पाहायला मिळेल की नाही, याचीही खात्री नव्हती. तरीही, मला माझ्या आयुष्यातील कोणताही भाग बदलायचा नाही. जर मी ते 63 दिवस अनुभवले नसते, तर आज मी जो राज कुंद्रा आहे, तो झालो नसतो. तसेच, कोण खरोखर माझे आहेl आणि कोण नाही, याची मला जाणीव झाली नसती.” असं देखील राज कुंद्रा म्हणाला.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचं लग्न
राज कुंद्रा एक ब्रिटिश – भारतीय उद्योजक आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा (husband) निर्णय घेतला. 2009 मध्ये राज आणि शिल्पा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. त्यानंतर 2012 मध्ये अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर 2020 मध्ये सरोगेसीच्या माध्यमातून मुलीचं घरात स्वागत केलं. सांगायचं झालं तर, शिल्पा, राज कुंद्रा याची दुसरी बायको आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर राज याने शिल्पा हिच्यासोबत लग्न केलं.
हेही वाचा :
पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?