पुणे – मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधाम चौकात आज (मंगळवार) सकाळी ११:१५ वाजता झालेल्या भीषण अपघातात(accident) एका महिलेचा मृत्यू झाला असून एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे. ट्रक (MH 14 AS 8852) ने स्कूटरला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला.
मृत महिलेचे नाव दिपाली युवराज सोनी (वय २९) असून जखमी व्यक्तीचे नाव जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) असे आहे. जखमींवर सध्या स्पायरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
अपघाताचा (accident)थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सिग्नल सुटल्यानंतर स्कूटर पुढे जात असताना ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत स्कूटरला धडक दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
ट्रक चालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय ५१, रा. भवानी पेठ) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे आणि या प्रकरणी BNSS कलम १०५ अन्वये (आयपीसी ३०४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातानंतर चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल होताच ट्रक बाजूला करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करीत आहेत.
पोलीस व महानगरपालिकेच्या वतीने अपघात टाळण्यासाठी पुढील काळात संयुक्तपणे विशेष उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :