तरुण कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एजबॅस्टन येथे(written) इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभूत करून इतिहास लिहिला आहे. या विजयात मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांचा मोठा वाटा आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना आठवणीत राहील असा झाला आहे. या सामन्यात तरुण कर्णधार शुभमन गिलच्या(written) नेतृत्वाखालील टीम इंडियाने एजबॅस्टन येथे इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभूत करून इतिहास लिहिला आहे. टीम इंडियाने बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे पहिल्यांदाच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. परदेशात कसोटी स्वरूपातील हा भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या सामन्यात शुभमन गिलसह गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाने यजमान इंग्लंडचा ३३६ धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाच्या या विजयात मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांचा मोठा वाटा आहे. यामध्ये सिराजने दोन डावात(written) ७ विकेट्स आणि आकाश दीपने दोन्ही डावात मिळून १० बळी घेतले. यानंतर सोशल मीडियावर ‘दो भाई, दोनो तबाही’ नावाची पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे.
‘दोनो भाई, दोनो तबाही’ नावाची पोस्ट व्हायरल
भारताच्या विजयानंतर आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सकडून सोशल मीडियावर एक मजेदार पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आकाश दीप आणि मोहम्मद सिराजचा फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, ‘दो भाई, दोनो तबाही’. एक प्रकारे या दोन्ही गोलंदाजांनी एजबॅस्टनमध्ये इंग्लंड संघात कहर माजवला आहे. त्यामुळे हा शब्द दोघांनाही शोभतोया आहे.
दोघांनी मिळून घेतल्या १७ विकेट्स
आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या भारतीय गोलंदाजांनी गोलंदाजीत एकमेकांना उत्तम साथ देऊन भागीदारी केली. या दोघांनी दोन्ही डावात इंग्लंडच्या १७ फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. पहिल्या डावात इंग्लंडचे फलंदाज मोहम्मद सिराजसमोर पाणी मागताना दिसून आले. सिराजने पहिल्या डावात इंग्लंडच्या ६ फलंदाजांना आपली शिकार बनवले. त्याच वेळी, दुसऱ्या डावात त्याने १ विकेट घेतली. एजबॅस्टन कसोटीत सिराजने एकूण ७ विकेट्स घेतल्या.
त्याच वेळी, बुमराहच्या जागी संघात सामील स्थान देण्यात आलेल्या आकाश दीप एजबॅस्टन येथे इंग्लंड संघासाठी एक वाईट स्वप्न ठरला. त्याने या कसोटी सामन्यात एकूण १० बळी टिपले. आकाश दीपने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ बळी घेतले आहेत. त्यामुळे इंग्लंड संघ धावसंख्येच्या जवळ देखील जाऊ शकला नाही.
हेही वाचा :
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर
धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video
‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं