इचलकरंजी महानगरपालिकेतील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना(employees)त्यांच्या निवृत्ती पश्चात लाभांच्या प्रतीक्षेत असलेल्या त्रासदायक प्रवासावर अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे. भाजपाचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत, आज पहिल्या टप्प्यात 23 सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकूण ₹1,08,27,013/- एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.

1 जुलै रोजी उमाकांत दाभोळे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदन सादर करत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना(employees) त्यांच्या भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी, शिल्लक रजेचा पगार इत्यादी हक्काचे लाभ वेळेवर मिळत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. निवेदनात असे नमूद करण्यात आले होते की, निवृत्त कर्मचाऱ्यांचे आयुष्य या निधीवर अवलंबून असते. वेळेवर लाभ न मिळाल्यास त्यांची आर्थिक स्थिती बिघडू शकते, औषधोपचार व दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात, तसेच कर्जावरील व्याज वाढत जाते.
या निवेदनाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी तातडीने संबंधित विभागांची बैठक बोलावली. बैठकीत लेखापाल, लेखापरीक्षण विभाग आणि आस्थापना विभाग यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ तत्काळ कार्यान्वित करण्यात यावेत.
या आदेशाच्या अनुषंगाने प्रशासनाने त्वरेने कारवाई केली असून आज पहिल्या टप्प्यात 23 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचा भविष्य निर्वाह निधी फंड त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाला आहे. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये(employees) समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पुढील काळात सर्वच सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे लाभ वेळेवर मिळावेत यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे उमाकांत दाभोळे यांनी सांगितले. त्यांच्या या प्रयत्नांचे कर्मचारी वर्गातून स्वागत होत आहे.
हेही वाचा :
“मराठी”च्या मोर्चाला प्रतिबंध पोलीस प्रशासनाचा दुजाभाव
कोण आहे टीम इंडियातील सासू? पंत आणि गंभीरने कपिलच्या शोवर केला खुलासा, Video Viral
रिलसाठी पालकांनीच चिमुकलीचा जीव घातला धोक्यात; धरणाच्या रेलिंगवर बसवले अन्…, Video Viral