काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसीचा दाखला आहे, असं ते म्हणाले होते. तसंच राज्यातील सर्व बड्या नेत्यांकडे ओबीसीचे दाखले आहेत. शरद पवार यांच्याकडे हा दाखल आहे की नाही ते मात्र मला माहिती नाही, असंही ते म्हणाले होते. (politics) दरम्यान, वडेट्टीवार यांचा हा दावा खुद्द सुप्रिया सुळे यांनी खोडून काढला. हे ऐकून मला धक्का बसला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत वडेट्टीवार यांना काँग्रेसने समज द्यावी, अशी मागणी केली. आपण केलेल्या विधानाने वाद वाढण्याची शक्यता असल्याचे लक्षात येताच वडेट्टीवार यांनी आता माफी मागितली आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता, असे ते म्हणाले. तसेच माझा ओबीसींसाठीचा लढा मात्र सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विजय वडेट्टीवार यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी सुप्रिया सुळेंवर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता असे स्पष्टीकरण त्यांनी दिलेय. ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. (politics) त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो, असं वडेट्टीवार यांनी सपष्ट केलं.
तसेच याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही. एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचे मी कधीही समर्थन करणार नाही, (politics) असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे, असे म्हणत मी ओबीसींच्या हक्कांसाठी कायम संघर्ष करत राहील असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?