मलकापूरचे ‘मंगलपूर’ करण्याला ग्रामस्थांचा विरोध मोर्चा पाहून धाबे दणाणले घेतला मोठा निर्णय?

कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूरचे नाव बदलून मंगलपूर करण्याला ग्रामस्थांनी मोठा विरोध केला आहे. (Malkapur) त्यांनी या निर्णयाविरूद्ध एल्गार पुकारला असून मलकापूरमधील ग्रामस्थांनी नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढला आहे. शिवतीर्थपासून नगरपालिके पर्यंत निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

“पुन्हा उपोषण करण्यास भाग पाडले गेले, कदाचित जीवही जाईल; आता माघार घेणार नाही”; सोनम वांगचुक ग्रामस्थांनी आंदोलन करत मलाकपूरचे नाव मंगलपूर करण्याबाबतचा केलेला ठराव रद्द करण्यात यावा अशी जोरदार मागणी केली आहे. (Malkapur) दरम्यान, प्रशासनाकडून ठराव रद्द करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं.शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरचे नाव मंगलपूर करण्याबाबतचा ठराव काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. नरगाध्यक्ष रश्मी कोठावळे यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. मात्र याला नागरिकांचा मोठा विरोध होता. त्यानंतर हा ठराव स्थगित करण्यात आला होता.

ओमराजेंविरोधात नळदुर्गमध्ये शिवसैनिक उतरले रस्‍त्‍यावर मात्र ठराव स्थगित नाही तर रद्द करावा यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी मलकापुरात भव्य मोर्चा काढल्यानंतर आता हा ठराव रद्दा करण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थिती असा ठराव करू नसेय मलाकापूरचे नाव मलकापूरच असावं अशी मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीचे निवेदन देखील नगरपालिकेला देण्यात आले होते.नागरिकांचा तीव्र विरोध पाहून अखेर नगराध्यक्ष रश्मी कोठावळे यांना नमती भूमिका घ्यावी लागली. (Malkapur) त्यांनी मलकापूरचे मंगलपूर करण्याचा ठराव रद्द करणार असं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. नागरिकांनी जर या संदर्भात पुढे कधीही असा विचार करू नये अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सज्जड दम देखील नागरिकांनी भरला आहे.

हेही वाचा :

मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?

चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार? 15 आमदार फुटणार?