भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली सध्या त्याच्या कुटुंबासोबत लंडन(cute) येथे वेळ घालवत आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा ही त्यांची दोन मुलं वामिका आणि अकाय सोबत सध्या लंडनमध्ये राहते. सोमवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. अनुष्काने 15 फेब्रुवारी रोजी मुलगा अकाय याला जन्म दिला तेव्हा यंदा वामिका आणि अकाय याचे पहिले रक्षाबंधन होते. अनुष्काने मुलांच्या पहिल्या रक्षाबंधनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला त्याच्यावर नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
अनुष्का आणि विराट आपल्या मुलांना सोशल मीडियापासून(cute) दूर ठेवतात. त्यांनी अद्याप आपल्या दोन्ही मुलांचे फोटो सुद्धा शेअर केलेले नाहीत. रक्षाबंधनाचा सण हा भावा बहिणीच्या नात्याचा पवित्र सण आहे. अनुष्का शर्माने रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दोन क्यूट राख्या पाहायला मिळाल्या. गाड्यांच्या आकाराच्या इकोफ्रेंडली लोकरीच्या धाग्यापासून बनवलेल्या राख्यांचं डिझाईन नेटकऱ्यांना सुद्धा फार आवडलं.
विराट आणि अनुष्काने 11 जानेवारी 2021 रोजी पहिल्या मुलीला जन्म दिला. जिचे नाव ‘वामिका’ असे ठेवण्यात आले. विराट आणि अनुष्काने त्यांच्य मुलीचे अनेक फोटो शेअर केले आहेत मात्र त्या एकाही फोटोमध्ये तिचा चेहरा दाखवलेला नाही. विराट आणि अनुष्काला 15 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव ‘अकाय’ असं ठेवण्यात आलं.
काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या वनडे सिरीजमध्ये भारताचा 0-2 ने पराभव झाला, तर एक सामना बरोबरीत सुटला. यात कर्णधार रोहित शर्मा वगळता इतर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. स्टार फलंदाज विराट कोहलीला मैदानात जम बसवता आला नाही. विराटने तीन सामन्यांच्या मालिकेत केवळ 58 धावाचं केल्या.
श्रीलंका विरुद्ध झालेल्या सिरीजनंतर टीम इंडिया आता बांगलादेश विरुद्ध सिरीज खेळण्यासाठी उतरणार आहे. त्यापूर्वी इतर रोहित, विराट आणि बुमराहला बीसीसीआयने विश्रांती दिली असून इतर खेळाडू हे दुलिप ट्रॉफीमध्ये खेळणार आहेत सप्टेंबर पासून बांगलादेश सिरीज सुरु होणार असून त्यापूर्वी विराट कोहली लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
अनुष्का विराटचा मुलगा अकाय याचा जन्म लंडनमध्येच झाला होता. विराट आणि अनुष्काला आपल्या मुलांसह एका सामान्य व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगायचं आहे अशी इच्छा त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केली होती. मात्र भारतात जिथे विराटची सर्वाधिक फॅन फॉलोईंग आहे तिथे हे शक्य नाही. म्हणून विराट आणि अनुष्का बहुतेकवेळा लंडन येथे जातात.
हेही वाचा :
बदलापूर आंदोलन चिघळलं! पोलिसांवर दगडफेक तर पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या
एम एस धोनीचा देसी अंदाज, मित्रांसोबत ढाब्यावर मोकळ्या आकाशाखाली केली पार्टी Photo
महाभयंकर! नराधमाकडेच चिमुकलींना वॉशरुमला नेण्याची जबाबदारी, शाळेच्या कारनाम्याचा कहर