चक्क विहिरीचं पाणी पेटलं, सांगलीच्या उमदीत निसर्गाचा चमत्कार उसळली मोठी गर्दी?

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीच्या पाण्यात पेट्रोलसदृश्य द्रव आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून विहिरीच्या पाण्याला उग्र पेट्रोलसारखा वास येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (shocking) मात्र, आता पाण्यावर पेट्रोलसदृश्य पदार्थ स्पष्टपणे तरंगताना दिसून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

उमदी येथील दुंडाप्पा माळी यांच्या विहिरीत हा प्रकार आढळल्याचे सांगण्यात येत आहे. या विहिरीच्या पाण्याला गेल्या वर्षभरापासून पेट्रोलसारखा वास येत होता. त्यामुळे हे पाणी शेतीसाठी तसेच जनावरांसाठी वापरणे टाळण्यात येत होते. पाणी पिण्यासही अयोग्य असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.दरम्यान, विहिरीतील पाणी प्लास्टिकच्या बाटलीत भरल्यानंतर त्याच्या पृष्ठभागावर पेट्रोलसदृश्य पदार्थ तरंगताना दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. (shocking) त्यानंतर ग्रामस्थांनी पाणी शेतात सोडून त्याची पाहणी केली. या पाण्याच्या ठिकाणी पेटती काडी धरल्यानंतर आग लागल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला आहे. पाणी ज्या भागात पसरले होते, त्या ठिकाणीही जाळ जाणवल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. विहिरीच्या पाण्यात पेट्रोलसदृश्य पदार्थ नेमका कसा आला, याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. परिसरातून जाणारी पेट्रोलची एखादी पाइपलाइन फुटली असावी आणि त्यातून गळती झालेला पदार्थ जमिनीत झिरपून विहिरीच्या जलस्रोतामध्ये मिसळला असावा, अशी शक्यताही ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.मात्र, विहिरीच्या पाण्यात नेमका कोणता पदार्थ मिसळला आहे, याबाबत अधिकृत तपासणी होणे आवश्यक आहे. (shocking) त्यामुळे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि या प्रकारामागील नेमके कारण शोधावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तपासणीनंतरच हा पदार्थ पेट्रोल आहे की अन्य कोणते रसायन, हे स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :

माधुरी वनतारामधून निघाली शुक्रवारी पहाटेपर्यंत नांदणीत पोहचणार?

LPG गॅस बुकिंगचा नियम बदलला जाणून घ्या नवीन नियम?

एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत, जास्त खात्याने काय समस्या येऊ शकते ?