आम्ही तुम्हाला डिजीटल अरेस्ट करतोय, एक व्हिडीओ कॉल आणि… नाशिकमध्ये त्या चार लोकांसोबत काय घडलं?

नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांनी “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली चार नागरिकांची १ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. गुन्हेगारांनी दहशतवादी(Terrorist) निधीच्या आरोपाखाली भीती निर्माण करून पैसे लुटले. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी सुरू केली आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यातच आता ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे प्रकारांमध्येही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आता आता नाशिकमध्येही अशीच एक मोठी घटना उघडकीस आली आहे. सायबर गुन्हेगारांनी शहरातील चार वेगवेगळ्या उपनगरांतील लोकांना तब्बल १ कोटी २९ लाख ४ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. तुमच्या नावावर दहशतवादी(Terrorist) संघटनांसाठी मनी लॉन्ड्रिंग किंवा टेरर फंडिंग होत असल्याचं सांगत त्यांची फसवणूक करण्यात आली. नाशिकमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.

या सायबर गुन्हेगारांनी नाशिकमध्ये चार जणांची तब्बल १ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या गुन्हेगारांनी लोकांना ‘डिजीटल अरेस्ट’ची भीती दाखवली. त्यांनी या लोकांना फोन केला आणि सांगितले. “तुमच्या नावावर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बँक खाते उघडण्यात आले आहे. या खात्यातून दहशतवादी संघटनांना पैसे पाठवले जात आहेत.” यामुळे तुम्हाला लवकरच अटक होईल, अशी भीती या चौघांना दाखवण्यात आली.

त्यानंतर त्यांना आम्ही तुम्हाला सध्या डिजिटल पद्धतीने अटक करत आहोत. तुम्ही घराबाहेर पडू नका किंवा कोणालाही काहीही सांगू नका’ असं सांगून घाबरवण्यात आलं. या अटकेपासून वाचवण्यासाठी आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने पैसे घेतले. या प्रकरणी झालेल्या फसवणुकीत चार लोकांकडून मिळून १ कोटी २९ लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेतले.

या चौघांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं सांगितलं आहे.या प्रकारानंतर, पीडितांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून लवकरच गुन्हा दाखल करणार आहेत. या प्रकरणामुळे सायबर गुन्हेगारांची नवीन युक्ती समोर आली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फोन कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

डिजिटल अरेस्ट ही एक प्रकारची ऑनलाईन फसवणूक आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार लोकांना फोन करून सांगतात की त्यांच्या नावावर बेकायदेशीर काम झाले आहे. ते स्वतःला पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवतात आणि सांगतात की तुम्हाला अटक वॉरंट निघाले आहे. त्यानंतर, ते ‘तुम्ही आता डिजिटल पद्धतीने अटक झाला आहात, त्यामुळे घराबाहेर पडू नका’, असे सांगतात. भीतीने लोक घाबरतात. याच भीतीचा फायदा घेऊन ते प्रकरण मिटवण्यासाठी ऑनलाइन पैसे मागतात. ‘डिजिटल अरेस्ट’ ही खरी अटक नाही, हा फक्त फसवणुकीचा एक मार्ग आहे. अशा धमक्यांना घाबरून पैसे देऊ नका.

हेही वाचा :

राज्यासाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर
राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले; माजी राज्यपाल काळाच्या पडद्याआड!
भारतातील ‘या’ ठिकाणी दरवर्षी सापडतात हिरे, अनेकजण रातोरात बनतात मालामाल