५ कोटी की सोन्याची बिस्किट नक्की मामला काय? ‘येरे येरे पैसा ३’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला(viki rakuten) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची विशेष उपस्थिती होती. या दोन दिग्गजांच्या उपस्थितीने या ट्रेलर लॉन्च सोहळयाला चारचांद लागले. यावेळी त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

यापूर्वीच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ट्रेलरने त्या उत्सुकतेत आणखीनच भर घातली आहे. ट्रेलरमध्ये ५ करोड रुपये आणि सोन्याच्या(viki rakuten) बिस्किटांसाठी चाललेली प्रचंड धावपळ आणि गोंधळ पाहायला मिळतोय. सगळ्यांचेच लक्ष त्या पाच करोड रुपयांवर आहे. मात्र या ५ करोड रुपयांचा खेळ कोण जिंकणार? हे प्रेक्षकांना १८ जुलैपासून चित्रपटगृहात समजणार आहे!

राज ठाकरे यांनी चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “अमेय खोपकर या चित्रपटाचे तीन भाग घेऊन आले आहेत, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाची बाब आहे. हा एक मैलाचा दगड आहे.(viki rakuten) चित्रपटाचा ट्रेलर धमाल असून याला उत्तम कलाकारांची साथ लाभली आहे. ‘येरे येरे पैसा’ ब्लॅाकबस्टर होता आणि तीनही नक्कीच तसाच ब्लॅाकबस्टर ठरेल, याची खात्री आहे.’’

रोहित शेट्टी म्हणाले, “चित्रपटाचा ट्रेलर कमाल आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा पूर्णपणे बॉलिवूड लेव्हलचा एंटरटेनमेंट पॅकेज आहे. संजय जाधव आणि टीमचं काम जबरदस्त असून या चित्रपटाला माझ्याकडून खूप शुभेच्छा.’’

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित आणि वर्डविझार्ड एंटरटेनमेंट सहनिर्मित या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते असून सौरभ लालवाणी हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..