विधान परिषद निकालानंतर महाराष्ट्रातील महायुतीत मोठा अंतर्गत स्फोट झाला आहे. शिंदे सेनेने युती धर्म पाळला नसल्याचा भाजपचा आरोप आहे, (Legislative) तर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी थेट ‘युतीला अर्थच काय?’ असा संतप्त सवाल विचारला आहे. अंतर्गत गटबाजीमुळे महायुतीला जागा गमवाव्या लागल्याचे स्पष्ट झाले आहे, ज्यामुळे सत्ताधारी पक्षातच तणाव वाढला आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा निकाल येताच महायुतीत मोठा स्फोट झाला आहे. (Legislative) सत्ताधारी पक्षातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भाजपने तर शिंदे सेनेवर उघड उघड हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे सेनेने युती धर्म पाळला नाही. एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीच भाजपने केली आहे. भाजपने एकप्रकारे शिंदे सेनेवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. सेना-भाजपमध्ये जुंपलेली असतानाच आता राष्ट्रवादीनेही थेट शिंदे सेनेवर टीका केली आहे. असं होणार असेल तर युतीला अर्थच काय? असा उद्विग्न सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांनी सावध होणे गरजेचे आहे. आपण जर भांडत बसलो तर काय होते, याचे परिणाम दिसून आले आहेत. पुण्यामध्येही तसेच झाले. आपण आपापसातील भांडणे मिटवू शकलो असतो, तर स्मिता जाधव आमदार असत्या, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी उघडउघड विरोधात प्रचार केला. असे जर होत असेल, तर युतीला अर्थ काय राहिला? असा सवाल करतानाच मुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षांना एकत्र बसवून मार्ग काढला पाहिजे आणि असे धोके टाळले पाहिजेत. तरच युती एकसंघ राहील. आता तीन वर्षे काही निवडणुका नाहीत आणि हेच काम आता करावे लागेल, असं मुश्रीफ यांनी म्हटलंय.यावेळी त्यांनी अर्थ खात्यावरही भाष्य केलं. अर्थ खातं तुमचे आहे. आम्ही लवकरच हे खाते तुम्हाला देऊ आणि मंत्रिपदाच्याही जागा भरल्या जातील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आम्हाला अर्थ खातं मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधान परिषदेच्या पाच जागांचा निकाल आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या आहेत. (Legislative) तर महायुतीला दोन जागा मिळाल्या आहेत. महायुतीतील अंतर्गत संघर्ष, गटबाजी आणि नाराजी यामुळे महायुतीला तीन जागा गमवाव्या लागल्या आहेत. महायुतीतील पक्षांनीच एकमेकांच्या विरोधात प्रचार केल्याने त्याचा फटका तिन्ही पक्षांना बसला आहे. खासकरून शिंदे सेनेमुळे भाजपला आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला असून शिंदे सेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या रडारवर आली आहे.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी जय पवार थेट सीआयडी कार्यालयात काय आहे प्रकरण
BMC कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, दिवाळीपूर्वी इतके रुपये मिळणार
मनोज जरांगे दारू पितात का काय दिलं उत्तर म्हणाले, मी आत्महत्याच