कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधान भवन आणि परिसर हा विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार प्रभावाखाली येतो. तिथे घडणाऱ्या प्रत्येक बऱ्या वाईट घटनांचे उत्तरदायित्व त्यांच्याकडेच जात असते. म्हणूनच शुक्रवारी विधान भवन लॉबीमध्ये हाणामारीचा (political) झोप निंदनीय प्रकार घडला त्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.

या घटनेची चौकशी मुळापर्यंत जाऊन केली तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात आणावे लागेल. दोघांचाही राजकीय इतिहास, त्यांची भाषा सभ्यता तपासून पहिली तर त्यांनी जे पेरलं तेच उगवलं असं शुक्रवारच्या “राड्या”वरून म्हणता येईल.
म्हणूनच या दोघांनाही विधानसभा अध्यक्षांनी क** शब्दात आणि लिखित स्वरूपात समज दिली पाहिजे. हाणामारी करणाऱ्या
या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना विधान भवन परिसरात प्रवेशासाठी कोणी पास दिले होते याचीही चौकशी केली तर सुरक्षा व्यवस्थेचा ढिसाळ व्यवहार पुढे येईल.
गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा(political) चेहरा बदलला आहे, तो काहीसा काळवंडला आहे. भाषा सभ्यतेचा तर मुडदाच पाडला गेला आहे. पूर्वी आमदाराच्या भोवती सच्चा कार्यकर्त्यांचा गराडा पडलेला असायचा. आता हौसे, नवसे, गवसे यांच्याबरोबरच सराईत गुंडही आमदाराच्या अवतीभवती दिसू लागले आहेत. विधान भवन परिसरात जे कार्यकर्ते शुक्रवारी एकमेकांना भिडले ते गुंडच होते आणि त्यांच्यावर पूर्वी काही गुन्हे दाखल झालेले आहेत अशी माहिती समोर आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या या कार्यकर्त्यांचा इतिहास माहीत नव्हता असे कसे म्हणता येईल?
एकेकाळी राजकारणात साधनसूचीतेला प्राधान्य देणाऱ्या, मूल्य संस्कार असलेल्या भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर हे आमदार आहेत. त्याच्याही आधी ते विधान परिषदेवर होते. विरोधकांच्यावर तुटून पडताना ते जी भाषा वापरतात त्याचे समर्थन एखादा टपोरी मुलगाही करणार नाही. त्यांची भाषा शिवराळ असते आणि मी ज्या समाजातून आलेलो आहे.
तिथे हीच भाषा बोलली जाते असे ते समर्थन करत असतात. मध्यंतरी त्यांनी शरद पवार(political)आणि त्यांच्या कुटुंबावर केलेली टीका ही अतिशय हिणकस पातळीवरची होती. वास्तविक भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पडळकर यांना योग्य त्या भाषेत समज देणे अतिशय गरजेचे आहे. जितेंद्र आव्हाड हे तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते.

वादग्रस्त विधाने करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. इतिहासाच्या प्रांतात शिरून ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच क्रूर कर्मा औरंगजेब विषयी बेताल वक्तव्य करताना अनेकदा दिसले आहेत. व्यवसायाने अभियंता असलेल्या कुरमुसे नामक तरुणाला त्यांनी मुंब्रा येथील निवासस्थानी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांचे कार्यकर्तेही होते. कोणत्याही विषयावर ते तोंडपाटीलकी करत असतात आणि आपण कसे बरोबर आहोत याचा युक्तिवादही ते करत असतात.
गोपीचंद पडळकर विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा एक संघर्ष गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या संघर्षात आता त्यांचे कार्यकर्तेही उतरलेले दिसतात. शुक्रवारी विधानभवनामध्ये(political) जो काही हाणामारीचा तमाशा झाला त्यामध्ये या दोघांचेही कार्यकर्ते सहभागी होते. विधान भवन लॉबीमध्ये मी असतो तर मलाही त्यांनी मारलेच असते कारण ते मला मारहाण करण्यासाठीच विधानभवनात आले होते असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पण त्यांच्याबरोबर त्यांचे जे काही कार्यकर्ते होते ते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते का या प्रश्नाचे उत्तर कोण देणार?
गोपीचंद पडळकर यांनी घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून माफी मागितली आहे. त्यांचे जे काही कार्यकर्ते विधानभवनात आले होते त्यांच्याकडे रीतसर प्रवेश पत्रिका नव्हती अशी माहिती पुढे आली आहे. तर मग प्रवेश पत्रिकेशिवाय त्यांना आत सोडले कोणी याचीही चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(political), व अन्य काही जणांनी घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय आहे. पण त्यांनी चौकशीचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलवला आहे. आता घडलेले या अतिशय निंद्य प्रकरणाची चौकशी होईलच. येथून पुढे अशा काही गोष्टी घडणार नाहीत यासाठीच्या उपाययोजना केल्या जातील.
तथापी घडलेल्या घटनेची विधिमंडळाच्या इतिहासात काळया शाईने नोंद केली जाईल. शुक्रवारी घडलेला हा प्रकार विधानभवनाच्या लॉबीमध्ये घडला होता पण सुमारे 45 वर्षांपूर्वी वसंत दादा पाटील हे मुख्यमंत्री असताना विधिमंडळ अधिवेशनात कोल्हापूरचे पन्हाळा बावड्याचे आमदार यशवंत एकनाथ पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या एका आमदाराला उचलून खाली आपटले होते.
फ्रीस्टाइल कुस्तीच सदनामध्ये झाली होती. पण त्यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून संबंधित आमदारांना अतिशय कठोर शब्दात खडसावले होते. हा फ्रीस्टाइल कुस्तीचा प्रकार विधिमंडळ अधिवेशनात पहिल्यांदाच घडला होता. त्याच्याही आधी विदर्भवीर जांबुवंतराव थोटे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या दिशेने काचेचा पेपरवेट फेकला होता. तेव्हा विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेवरून जांबवंतराव धोटे यांच्याविरुद्ध कोणाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी विधान भवन लॉबी मध्ये घडलेल्या घटनेमुळे या जुन्या घटनांना उजाळा मिळाला आहे.
हेही वाचा :
स्टंटमन राजूच्या मृत्यूने अक्षय कुमार हादरला! थेट 3 कोटींहून अधिक रुपयांचा…
सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार ‘हे’ शेअर्स
धक्कादायक ! सिगारेटसाठी लायटर दिलं नाही म्हणून आला राग; लोखंडी पान्याने केली भावाची हत्या