कायदे मंडळाचा सदस्यच जेव्हा कायदा हातात घेतो

कोल्हापूर/विशेष्य प्रतिनिधी : आमदार हा कायदे मंडळाचा सदस्य असतो.अधिवेशन काळात त्यांने लक्षवेधीच्या माध्यमातून, औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन, स्थगन प्रस्तावाच्या निमित्ताने काही प्रश्न मांडायचे असतात,सरकारकडून प्रश्नांची उत्तरे घ्यायची असतात. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याची त्याच्यावर जबाबदारी असते, आणि
म्हणूनच आमदाराने(employees) जबाबदाऱ्यांनी वागायचे असते. पण त्याचे भान बऱ्याच जणांना नसते. मग काही जण वादग्रस्त विधाने करतात, त्यांच्याकडून भाषा सभ्यता पाळली जात नाही. काहीजणाना मुद्द्यापेक्षा गुद्दे महत्त्वाचे वाटतात. बुधवारी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्याकडून जो काही प्रकार घडला त्याचे समर्थन करता येणार नाही.

आमदार निवासातील रूममध्ये आमदार(employees) संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधून जेवण मागवले होते. ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होतेच शिवाय पदार्थांना आंबूस वास येत होता. जवळपास त्यांचे जेवण नासलेले होते. जेवणाचा एक घास खाल्ल्यानंतर त्यांना मळमळल्यासारखे झाले. मग ते नासके जेवण घेऊन खाली कॅन्टीन मध्ये आले आणि जो कर्मचारी जेवण घेऊन आला होता त्याला चांगलेच थोबडून काढले. दोघा जणांच्या तोंडावर गुद्दे मारले. हा सारा प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व वृत्तवाहिन्यांवर तो व्हायरल झाला.

ज्या कर्मचाऱ्यांना(employees) त्यांनी जबर मारहाण केली ते वेटर होते. म्हणजे ते काही स्वयंपाकी नव्हते. म्हणजे कॅन्टीन मधील किचनमध्ये खाद्यपदार्थ बनवणारे किंवा जेवण बनवणारे राहिले बाजूला आणि मार दुसऱ्यालाच खावा लागला. अन्नातून विषबाधा होईल, होऊ शकते अशा प्रकारचे जेवण बनवणे हा प्रकार गंभीरच आहे. तू जीवाशी खेळ आहे. त्याबद्दल कॅन्टीन चालकासह स्वयंपाकी यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि तो होईलही. कारण अन्न व औषध प्रशासनाने अन्नाचे पदार्थ, नमुने ताब्यात घेतले आहेत.

जेवणाचा वास आल्यावर आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला फैलावर घेणे आवश्यक होते. संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना तेथे पाचारण करणे गरजेचे होते पण त्यांनी थेट कायदाच हातात घेतला. माझ्यासारख्या आमदाराला असले जेवण देतात म्हणजे काय? अशीच त्यांची कॅन्टीन मधली देहबोली होती. कॅन्टीनमध्ये इतरही काही लोक जेवत होते, नाश्ता करत होते. त्यांच्याही ताटात असेच आंबूस वास येत असलेले पदार्थ आहेत का याचीही तपासणी किंवा चौकशी आमदार गायकवाड यांनी करायला हवी होती.

आमदार संजय गायकवाड यांच्याकडून घडलेल्या या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराजे देसाई आदींनी दखल घेतली. गायकवाड यांनी रीतसर तक्रार करणे आवश्यक होते, कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांना (employees)मारहाण करणे चुकीचे आहे असे फडणवीस यांनी म्हटले असले तरी ते गृहमंत्री आहेत. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देणे आवश्यक होते. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून घडलेला गुन्हा हा तसा अदखलपात्र आहे. पण एका आमदाराकडून कायदा हातात घेणे हे गंभीर आहे.

आमदार निवासातील कॅन्टीनच्या पदार्थविषयक दर्जाबद्दल यापूर्वीही तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने योग्य ती कारवाई यापूर्वीच करणे आवश्यक होते. पण तसे झालेले दिसत नाही. आता या कॅन्टीन बद्दल शासन योग्य तो निर्णय घेईल. कदाचित कॅन्टीनचे कंत्राट रद्द केले जाईल.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे आहेत. तेथे भोजन व्यवस्था आहे. पण विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या जेवणाच्या चवी बद्दल विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतात आणि आहेत. जेवणाच्या दर्जाबद्दल तक्रारी आहेत.

काही ठिकाणी अन्नातून विषबाधाही झालेली आहे. पण त्याबद्दल संजय गायकवाड यांनी कधी आवाज उठवला आहे असे दिसत नाही. ते बुलढाण्याचे आहेत. तेथील शासकीय रुग्णालयाच्या आवारातील घाणीचे साम्राज्य त्यांनी कधी पाहिलेले नाही, रुग्णांसाठी जेथे भोजन बनवले जाते त्याला लागूनच कचऱ्याचे ढीग आहेत. त्याच्याबद्दलही आमदार गायकवाड यांनी आवाज उठवला पाहिजे.

आमदार निवासाच्या खाली असलेल्या कॅन्टीन बद्दल त्यांनी कायदा हातात घेतला याचे समर्थन करता येत नाही पण त्यांनी ज्या कारणासाठी हा जो काही प्रकार केला त्याचेही समर्थन करता येणार नाही. कॅन्टीन मधील सर्व पदार्थ हे चवदार आणि उत्कृष्ट दर्जाचे असले पाहिजेत. कॅन्टीन विषयक एक समितीही असते. या समितीच्या सदस्यांनी कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांच्या दर्जाबद्दल जागृत असणे गरजेचे आहे.

काही वर्षांपूर्वी आमदारांसाठी असलेल्या कॅन्टीनमध्ये दिला जाणारा चहा हा कप भरून दिला जात नसे. कपामध्ये चहा कमी दिला जातो. त्याचा एकदा अंदाजीत हिशोब समितीमधील एका सदस्यांने केला होता. 100 कप चहा हा 125 लोकांना दिला जातो. म्हणजे वरच्या 25 कपांचे पैसे कॅन्टीन चालकाला ज्यादा मिळतात. असा हिशोब करून कॅन्टीन चालकाला खडसावल्यानंतर त्याने पुन्हा असे होणार नाही असा शब्द दिला होता.

पूर्वी कधीतरी चहाच्या कपाचा हिशोब मांडला गेला असेल तर आजच्या काळात कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल विचार होणे आवश्यक वाटते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाच्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त करणे बरोबर आहे पण त्यासाठी त्यांनी निवडलेला किंवा केलेला व्यवहार चुकीचा आहे.

हेही वाचा :

बायकोला रोख रक्कम देताय, कापला जाईल टॅक्स

अखेर युट्यूबर अरमान मलिक करणार व्लॉगिंग बंद; चाहत्यांना बसला धक्का!

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दुसरी ते आठवीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर