उचकी ही जरी गंभीर त्रास न वाटणारी गोष्ट असली, तरी ती योग्य वेळी(time) थांबवली नाही तर त्रासदायक ठरू शकते. पुढच्या वेळेस उचकी सुरू झाली, तर या घरगुती उपायांपैकी कुठलाही सहज वापर करा लगेचच आराम मिळेल.
उचकी का लागते? कारणं आणि घरगुती उपाय एकत्र जाणून घ्या

महत्त्वाच्या मीटिंगमध्ये, कोणाशी संवाद साधताना किंवा जेवताना अचानक उचकी सुरू झाली, तर ही छोट्याशा वाटणारी समस्या खूपच अस्वस्थ करणारी ठरते. काही वेळा उचकी काही क्षणांत थांबते, (time)पण कधी ती इतकी जोरात लागते की पाणी प्यायलं, श्वास रोखून धरला तरी काही फरक पडत नाही. अशावेळी अनेकजण वेगवेगळे घरगुती उपाय करून पाहतात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही पदार्थ असे आहेत जे उचकी लगेच थांबवू शकतात? त्याआधी समजून घेऊया की उचकी येते तरी का?
उचकी का येते?
डॉक्टर सांगतात की उचकी येण्यामागे आपल्या छाती आणि पोटामधील डायाफ्राम या स्नायूंचं अचानक आकुंचन कारणीभूत ठरतं. या आकुंचनामुळे फुफ्फुसांतील हवा जोरात बाहेर फेकली जाते (time)आणि गळ्याजवळील स्वरयंत्र क्षणभर बंद होतात. त्यामुळे “हिक्” असा आवाज होतो. काही वेळा ही प्रक्रिया आपोआप होते, पण काही विशिष्ट कारणांमुळेही उचकी लागू शकते.
उचकी येण्यामागील शक्य कारणं:
- खूप वेगात अन्न गिळणं
- जास्त मसालेदार अन्न खाणं
- अपचन किंवा गॅसची तक्रार
- अतिथंड पदार्थ किंवा पेय
- हवामानात अचानक बदल
- खूप हसणं किंवा रडणं
उचकी थांबवणारे 5 प्रभावी घरगुती उपाय
- लिंबाचा आंबटपणा गळ्याच्या मज्जासंस्थेला उचकावतो आणि उचकी थांबते. लिंबाचा तुकडा चावून खा किंवा थोडं रस प्या.
- मधातील नैसर्गिक एन्झाइम्स गळा आणि डायाफ्राम शांत करतात. एक चमचा मध कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने उचकी कमी होऊ शकते.
- थोडीशी साखर जीभेवर ठेवून हळूहळू चोचल्याने मेंदूकडे जाणारे सिग्नल बदलतात आणि उचकी आपोआप बंद होते.
- थंड दही गळ्याच्या नसा शांत करते व उचकी दूर करते.
- हळूहळू एक ग्लास थंड पाणी प्यायल्याने डायाफ्राम शांत होतो आणि उचकीवर झटपट परिणाम होतो.
उचकी न लागण्सायाठी कोणती काळजी घ्यावी
शरीरावर ताण येतो आणि उचकीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे या काळात स्वतःची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचनसंस्थेची काळजी घेतली पाहिजे कारण अपचन, गॅस किंवा मसालेदार अन्न उचकी वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे हलकं, घरचं आणि वेळेवर अन्न खाणं आवश्यक आहे. पाण्याची कमतरता होऊ देऊ नका; दिवसाला किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या, जेणेकरून शरीरातील डायाफ्राम योग्य कार्य करू शकेल. तणाव हीदेखील एक प्रमुख कारण आहे, त्यामुळे दररोज काही वेळ ध्यान, योगा किंवा श्वसन व्यायाम करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर खाण्याची घाई न करता सावकाश चावून अन्न खा, जेणेकरून पचन सुरळीत होईल आणि उचकीचा त्रास होणार नाही.
हेही वाचा :
“मराठी”च्या मोर्चाला प्रतिबंध पोलीस प्रशासनाचा दुजाभाव
कोण आहे टीम इंडियातील सासू? पंत आणि गंभीरने कपिलच्या शोवर केला खुलासा, Video Viral
रिलसाठी पालकांनीच चिमुकलीचा जीव घातला धोक्यात; धरणाच्या रेलिंगवर बसवले अन्…, Video Viral