पावसाळ्यात का वाढतो डायरियाचा धोका? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या आरोग्याची काळजी,

पावसाळ्यात वेगाने पसरणारा आजार म्हणजे डायरिया.(octafx spread) यामुळे सतत पोटात दुखणे,पेटके, मळमळ आणि उलट्या इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. या आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा.

राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे.(octafx spread) पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. साथीच्या आजारांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. बाहेरील दूषित पाणी, रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ, जंक फूडचे अतिसेवन, मसालेदार तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात तेलकट तिखट पदार्थांचे सेवन न करता शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांच्या सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पोटाचे आरोग्य कायमच निरोगी राहील.

पावसाळ्यात वातावरणात सतत होणारे बदल, जंक फूडचे सेवन, दूषित पाणी इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडते. डेंग्यू, मलेरिया, डायरिया इत्यादी आजारांची लागण झाल्यानंतर शरीर(octafx spread) अतिशय कमकुवत होऊन जाते. डायरिया आणि कॉलरासारखे गंभीर आजार आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे सगळीकडे पसरतात. डासांची पैसाद मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर साथीचे आजार वाढू लागतात. अस्वच्छतेमुळे डायरियासारखे गंभीर आजार वाढू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डायरियापासून शरीराचा बचाव करण्यासाठी आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास आजारांपासून तुम्ही लांब राहाल.

हात स्वच्छ धुवणे:
कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणामुळे बाहेर कुठेही फिरून आल्यानंतर हात स्वच्छ धुवावे. अस्वच्छ हातांमुळे विषाणू थेट तोंडात जातात. ज्यामुळे डायरिया किंवा इतर साथीचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवणाआधी कमीत कमी २० सेकंड हात पाण्याने स्वच्छ धुवावे. यामुळे हातांवर जमा झालेले डायरिया किंवा इतर आजारांचे विषाणू नष्ट होऊन जातात.

स्वच्छ पाण्याचे सेवन:
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण पावसाळयाच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने पाणी उकळवून प्यावे. गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहते. डायरिया आणि जुलाब होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे दूषित पाणी. कोणत्याही ठिकाणावरील पाण्याचे सेवन केल्यामुळे पोटात घाणेरडे विषाणू जातात. ज्यामुळे पोटात दुखणे, जुलाब, उलट्या किंवा इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

फळे भाज्या चांगल्या स्वच्छ कराव्यात:
निरोगी आरोग्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन केले जाते. फळे आणि भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीर कायमच निरोगी राहते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारातून विकत आणलेल्या भाज्या काहीवेळ मिठाच्या पाण्यात टाकून ठेवाव्यात. यामुळे भाज्यांवरील आणि फळांवरील विषाणू नष्ट होतील.

अतिसार म्हणजे काय?

अतिसार म्हणजे वारंवार पातळ किंवा पाण्यासारखे जुलाब होणे. यात पोटात दुखणे किंवा पेटके येऊ शकतात.

अतिसाराची लक्षणे कोणती?

अतिसाराची मुख्य लक्षणे आहेत: वारंवार पातळ किंवा पाण्यासारखे मल होणे, पोटदुखी किंवा पेटके, मळमळ आणि उलट्या, निर्जलीकरण (शरीरात पाण्याची कमतरता).

अतिसारावर काय उपचार करावे?

निर्जलीकरण टाळण्यासाठी भरपूर पाणी, ORS (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन) किंवा स्वच्छ सूप प्या. जर अतिसार जास्त दिवस टिकला किंवा तीव्र झाला, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..