पावसाळ्याच्या दिवसांमध्ये का वाढतो पायांच्या गँगरीनचा धोका? जाणून घ्या लक्षणे आणि पाय स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पायांचा गँगरीन झाल्यानंतर त्वचेचे नुकसान होते. (skin)याशिवाय अधिक काळ दुर्लक्ष केल्यास पाय काप कापावा लागतो. जाणून घ्या गॅंगरीनची लक्षणे आणि गँगरीन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी.

संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या दिवसांमध्ये त्वचेवर इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे(skin) त्वचेसह संपूर्ण आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. पावसाळ्यात चिखल, खराब पाणी आणि इतर अनेक कारणामुळे पायांचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. त्यात अनेकांमध्ये दिसून येणारी समस्या म्हणजे गँगरीन. गँगरीन इन्फेक्शन झाल्यानंतर पायांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते आणि आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. गँगरीन झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये योग्य वेळी लक्ष न दिल्यास समस्या आणखीनच गंभीर होत जाते. याशिवाय पाय कापून टाकण्यास लागू शकतो.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांसोबतच त्वचा आणि पायांमध्ये इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. पावसाळा ऋतू संसर्ग वाढवण्यासाठी अनुकूल ठरतो. त्यामुळे पावसाळ्यात हातापायांना कोणतीही जखम होणार नाही याची जास्त काळजी घ्यावी. मधुमेह, रक्ताभिसरण, पायाला जखमा (skin)पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लवकर भरत नाहीत. गँगरीन हा अतिशय धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे. ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हा संसर्ग झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास पाय कापावा लागतो, अन्यथा गँगरीन संपूर्ण शरीरात पसरण्याची जास्त भीती असते.

पायाचे गँगरीन म्हणजे काय?
पायाचा गॅंगरीन होण्यामागे अनेक कारण आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे किंवा गंभीर जिवाणू संसर्गामुळे शरीरातील निरोगी पेशी मृत पावतात. ज्याचा परिणाम बोटांवर आणि संपूर्ण पायांवर होण्याची जास्त शक्यता असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत जाणवणारा ओलसरपणा आणि घाणेरड्या पाण्यामुळे त्वचेचे नुकसान होते आणि संसर्गाचा धोका वाढू लागतो.

गँगरीन होण्यामागील कारणे:
रक्तभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होणे
जखमा किंवा अल्सर
बुरशीजन्य किंवा जिवाणू संसर्ग
ओल्या चपला
कमकुवत रोगप्रतिकारशक्ती
गँगरीन झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे:
पायाच्या बोटांमध्ये सुन्नपणा जाणवणे
तीव्र वेदना
त्वचा काळीनिळी होणे
दुर्गंधीयुक्त स्त्राव किंवा पायांमधून पू येणे
ताप
पायांवर वाढलेली सूज
पायांचे गँगरीन टाळण्यासाठी सोप्या टिप्स:
पायांचा गँगरीन होऊ नये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओल्या चप्पल किंवा मोजे परिधान करू नयेत. यामुळे पायांवर इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. पायांवर फोड, जखम किंवा रंग बदलेला वाटू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. घरातील लादीवर अनवाणी पायानी चालू नये. नेहमीच पाय कोरडे आणि स्वच्छ ठेवा.

हेही वाचा :

बिग बॉस 19 मध्ये ५ मोठे बदल, सलमान खानसह नवीन ट्विस्ट

टीम इंडियासाठी वाईट बातमी! ऋषभ पंत दुखापतीमुळे एवढ्या महिन्यांसाठी संघातून बाहेर

वयाने लहान मुलांना Date का करत आहेत मुली? रिलेशनशिप सिक्रेटचा खुलासा