दिवाळीचा सण जवळ येत असताना साखरेच्या दरवाढीची चिंता वाढली आहे. सध्या खुल्या बाजारात साखरेचा दर सुमारे 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्याची माहिती असून, सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास दर 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (sugar) त्यामुळे साखरेची साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाकडून व्यापाऱ्यांच्या साठ्यावर लक्ष ठेवले जात आहे.

राज्यात दर महिन्याला सरासरी 3 लाख टन साखरेची गरज असते. सध्या राज्यात सुमारे 17 ते 18 लाख टन साखरेचा साठा उपलब्ध असल्याचे साखर विभागाकडून सांगण्यात आले आहे. (sugar) त्यामुळे सध्या तातडीने साखरेची कमतरता नसली तरी दिवाळीतील वाढती मागणी आणि महाराष्ट्रातून दक्षिणेकडील राज्यांना होणारा पुरवठा यामुळे बाजारभावावर दबाव येऊ शकतो.
साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरपर्यंत व्यापाऱ्यांसाठी साखर साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. (sugar) त्यानुसार एका ठिकाणी 400 टनांपेक्षा अधिक साखर साठवता येणार नाही. तसेच खरेदी केलेली साखर 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवण्यासही निर्बंध आहेत. दरम्यान, 15 ऑक्टोबरपासून साखर गाळप हंगाम सुरू होणार असल्याने नवीन साखर बाजारात उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे दिवाळीच्या काळात पुरवठा सुरळीत ठेवून दरवाढ रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.
हेही वाचा :
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या?
शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद मोंदीच्या मंत्रिमंडळात थेट विधानाने चर्चेला उधाण?
शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय घडलं पार्थ पवार काय म्हणाले अखेर बातमी आली समोर?