भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त,(member) इराण, इथिओपिया, यूएई आणि इंडोनेशिया या सर्व ब्रिक्स सदस्य देशांवर टॅरिफ लागू होणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी BRICS गटातील देशांना मोठा झटका देत, १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका,(member) सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया, यूएई आणि इंडोनेशिया या सर्व ब्रिक्स सदस्य देशांवर टॅरिफ लागू होणार आहे. यावर लवकर निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे BRICS आणि अमेरिकेत टॅरिफ वॉर सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, “ब्रिक्स गटाची स्थापना अमेरिका आणि अमेरिकन डॉलरला कमजोर करण्यासाठीच झाली होती. डॉलर हा किंग आहे आणि (member)तो तसाच राहणार. जर कोणी त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल.”
ट्रंप यांचा आरोप आहे की, BRICS देश वर्षानुवर्षे अमेरिकेचा आर्थिक फायदा घेत आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, इतर देश अमेरिकेवर अवाजवी कर आकारतात, तर अमेरिकेने मात्र अनेकदा विनासायास व्यवहार केले. यामुळे अमेरिकेला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आता मात्र हे बदलणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, १ ऑगस्टपासून हे अतिरिक्त टॅरिफ लागू होतील आणि अमेरिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर पैसे यायला सुरुवात होईल. “आम्ही केवळ इतर देशांचे नियमच वापरत आहोत. आता सर्वजण आम्हाला सवलती द्यायला तयार झालेत, कारण त्यांना समजलंय की आता अमेरिका मागे हटणार नाही,” असे ते म्हणाले.
हे वक्तव्य ट्रम्प यांनी अशा वेळी केले आहे, जेव्हा जागतिक व्यापारात BRICS देशांच्या वाढत्या प्रभावाबाबत अमेरिका चिंता व्यक्त करत आहे. व्हाइट हाऊसने नुकतीच एक अधिकृत घोषणा करत सांगितले की, ट्रम्प BRICS गटाला अमेरिकन हितासाठी वाढता धोका मानतात आणि त्याविरोधात सर्व आवश्यक पावले उचलण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
BRICS गटाची स्थापना 2009 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीनने केली होती. दक्षिण आफ्रिकेचा समावेश 2010 मध्ये झाला, आणि अलीकडे सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया, यूएई आणि इंडोनेशिया यांचाही गटात समावेश झाला आहे. त्यामुळे सध्या या गटात एकूण ११ सदस्य आहेत.
या टॅरिफ धोरणामुळे भारतासारख्या विकसनशील देशांच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः आयटी सेवा, फार्मा, पोलाद व वस्त्रोद्योग यासारख्या क्षेत्रांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. भारत सरकारकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
सध्या अमेरिका आणि BRICS देशांमधील व्यापारसंबंध आधीच तणावाखाली आहेत, आणि ट्रम्प यांच्या या नव्या घोषणेमुळे त्यात आणखी कटुता येण्याची शक्यता आहे. आता या टॅरिफला भारत आणि इतर BRICS देश कशी प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :