कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : उबाठा गटाच्या शिवसेनेचे उपनेते असलेल्या संजय पवार यांना पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही हे रवीकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुख पदी निवड केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. आपणाला विश्वासात घेतले नाही म्हणून त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे आणि आता तर ते शिवसेनेला(politics) जय महाराष्ट्र करण्याच्या मनस्थितीत असल्याचे समजते.

रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र स्वरूपात नाराजी निर्माण झाली होती. हर्षल सुर्वे यांनी तर शहर प्रमुख पदाचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तर संजय पवार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देऊन आपण सामान्य शिवसैनिक(politics) म्हणून काम करणार असल्याचे जाहीर केले होते. मातोश्री कडून त्यांना वेट अँड वॉच करण्यास सुचवण्यात आले होते.
नवनियुक्त रविकिरण इंगवले यांनी येत्या रविवारी दत्त मंगल कार्यालयात स्नेहभोजन आणि निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. शिवसेनेचे काही वरिष्ठ पदाधिकारी या मेळाव्याला येणार आहेत. मात्र या मेळाव्यापासून संजय पवार तसेच विजय देवणे यांना दूर ठेवण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नावही नाही.

शिवसेनेत येण्यापूर्वी कितीतरी वर्षे आधी रविकिरण इंगवले आणि विजय देवणे यांच्यात शत्रुत्व आहे. आता तर ते अधिक ठळक झाले आहे. संजय पवार(politics) यांच्याशी त्यांचे कधीही जमले नाही. इंगवले यांना जिल्हाप्रमुख केले जाऊ नये यासाठी संजय पवार प्रयत्नशील होते. पण त्यांना विश्वासात न घेता मातोश्री वरून रविकिरण इंगवले यांच्या नावाची जिल्हाप्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली होती.
संजय पवार यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला आहे आणि आता ते सामान्य शिवसैनिक आहेत मग त्यांचे नाव निर्धार मेळाव्यात घ्यायचे कशाला असा विचार इंगवले यांनी केलेला असावा. तर मग विजय देवणे हे सहसंपर्कप्रमुख असताना आणि त्यांनी त्या पदाचा राजीनामाही दिलेला नसताना त्यांचे नाव निर्धार मेळाव्यात निमंत्रण पत्रिकेत का घातले गेले नाही हा प्रश्न उरतोच.
एकूणच संजय पवार आणि त्यांचा गट नाराज असून सेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या मनस्थितीत आहे.
त्यांचा जय महाराष्ट्र हा शिवसेनेच्या उबाठा गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषता कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत अडचणीत आणू शकतो.
हेही वाचा :
न्यायासाठी प्राण “पणा” ला; चाड नसे मुर्दाड प्रशासनाला
कोल्हापुरात पावसाची दमदार बॅटिंग; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अनेक धरणेही भरली
वीज बिलाची नो चिंता, फडणवीस सरकारचे जनतेला मोठे गिफ्ट, 100 युनिटच्या आतील ग्राहकांना काय दिलासा