मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. शिंदेंनी पुरावे सादर करण्याचे आव्हान दिल्यावर, जरांगे आज ११ वाजता पुरावे देणार आहेत. मराठा समाजासाठी लढत असल्याचे सांगत, जरांगेंनी शिंदे गटाच्या नेत्यांवरही पलटवार केला. हे प्रकरण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवेल असे दिसते.

एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले आहे. तसा पुरावाच माझ्याकडे आहे. एकनाथ शिंदे यांनी हे पैसे घेतले की नाही? हे स्पष्ट करावं, असं आव्हानच मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं होतं. त्यावर शिंदेंनी पुरावे सादर करा, असं आव्हान शिंदे यांनी जरांगेंना दिलं होतं. जरांगे यांनी हे आव्हान स्वीकारलं असून आज 11 वाजता पुरावे सादर करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेपूर्वीच त्यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधत आता मी पुरावे देतोय. शिंदे जातवान असतील तर यामागे कोण आहे याचा शोध घेतील, असं आव्हानच मनोज जरांगे यांनी दिलं आहे.
जरांगेंनी पुरावे द्यावेत. त्याची आम्ही चौकशी करतो. (allegation) त्यामुळे मी 11 वाजता पुरावे देणार आहे. मी कुणाचा राजकीय प्लॅटफॉर्म बनत नाही. कुणाचाच बनत नाही. मी जातीसाठी रस्ता तयार केला आहे. मी जातीसाठी बोलतो. महायुतीने सांगायला आणि मी बोलायला मी काही कुणाचा नोकर नाही. महाविकास आघाडीने सांगायला आणि मी बोलायला मी काही कुणाचा नोकर नाही. मी मराठा समाजासाठी बोलतो. समाजासाठी काम करतो. त्यामुळेच शत्रू अंगावर घेतले आहेत. मी कुणाचं ऐकून बोलत नाही. मी सिद्ध करतोय. पुरावे आहेत म्हणून बोलतो. कुजबुज सुरू आहे, ते बोलतो. आता ते कोण आहेत हे तुम्ही शोधा. कारवाई करा. तुम्ही त्यात आहे की नाही हे दाखवा. जातवान असाल तर दाखवा आता, असं आव्हानच मनोज जरांगे यांनी दिलं आहे.
दसरा मेळाव्यातून टीका करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांचाही जरांगे यांनी समाचार घेतला. मी काय बोलतो हे आधी बघायला पाहिजे होतं. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. थोडा विचार करायला हवा. बुद्धीवर परिणाम झाल्यासारखं बोलू नये. भाषण करायला चान्स दिला म्हणून वचावचा बोलू नये. थोडं थांबावं. मुरब्बी नेते आहात, तर थोडं थांबा. विषय समजून घ्या. आम्ही काय शब्द वापरत होतो. कोण फायद्याचं आहे. कोण तोट्याचं आहे. हे पाहिलं पाहिजे. (allegation) त्यातून शोधलं पाहिजे, असं जरांगे म्हणाले. मी पुरावा देणार आहे. बघू आता. स्वाभिमानाच्या उंटावर गप्पा मारणारे लैच भाषण झोडत होते. पुरावा देतो. आता शोधा. तुमच्याकडे यंत्रणा आहे. शोधा आता. जातवान असतील तर शोधायला सुरुवात करतील. आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतील, असंही ते म्हणाले.
हेही वाचा :
दिवाळीपूर्वी पीएम किसानचे २,००० रुपये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार
पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या दरात अचानक वाढ, किमती किती वाढल्या