ठाकरेंच्या आंदोलनात सहभागी होणार? शरद पवार म्हटले, कोणीही सांगेल तुम्ही सहभागी व्हा…

राज्यात महायुती सरकारने हिंदी सक्तीचं धोरण जाहीर केलंय. याला मराठी भाषिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध जाहीर केला जातोय. हिंदी सक्तीवर बोलताना शरद पवार(political updates) म्हणाले की, याच्यामध्ये भाग दोन आहे. पहिली ते चौथी प्राथमिक तिथे हिंदीची सक्ती करणे योग्य नाही.

पाचवीपासून वर हिंदी येणं विद्यार्थ्याच्या हिताचं असल्याचं शरद पवार(political updates) यांनी म्हटलंय. साधारणत: महाराष्ट्रात लोक हिंदीच्या विरोधात नाही. मातृभाषा महत्वाची आहे. दोन्ही ठाकरेंचं वक्तव्य ऐकलं. तिथं गेल्यावर मी त्यांचं म्हणणं काय आहे, ते समजून घेणार आहे.

त्यांनी राजकीय कार्यक्रम जाहीर केले आहे. त्यात राजकीय(political updates) पक्षांनी सहभागी व्हावं असं म्हटलंय. जर सहभागी व्हायचं असेल तर यामागे त्यांचं नेमकं काय धोरण आहे, ते समजून घ्यावं लागेल असंही शरद पवार यांनी म्हटलंय. कोणीही सांगेल तुम्ही सहभागी व्हा, तर सहभागी होता येणार नाही. आधी त्यांचा मुद्दा समजून घ्यावा लागेल, असं ते शरद पवार यांनी म्हटलंय. मला याच्यात वाद दिसत नाही, फक्त सरकारने पहिली ते चोथीपर्यंत हिंदीचा हट्ट करू नये, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. जर ठाकरे बंधू पूर्वीचं सगळं विसरून, एकत्र येवून काही करत असेल तर काही हरकत नाही, असं देखील शरद पवारांनी म्हटलंय. तर काका-पुतणे एकत्र येणार का, याविषयी बोलणं यावेळी त्यांनी टाळलंय.

महायुती सरकारने शक्तीपीठ प्रकल्पावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलंय की, काही नवीन करायचं म्हणलं तर विरोध असतोच. पण हा विरोध हिताचा आहे किंवा नाही, याचा विचार करावा लागतो. यासाठी याभागातील शेतकऱ्यांची भूमिका समजून घ्यायची. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं नुकसान होवू देणार नाही, हे म्हणणं सरकारने पटवून दिलं तर विचार करता येईल, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

प्रकल्पाच्या दोन्ही बाजू समजत नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. यावेळेला मी सरकारची बाजू ऐकायची म्हणतोय. एवढा मोठा प्रोजेक्ट आणि फायनान्शिअल उभारणी आहे. यात किती यश मिळेल हे आज सांगता येणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत पुन्हा झाली घसरण

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पुन्हा अडचणीत

Flipkart वर जबरदस्त डील; iPhone 15 पेक्षाही कमी किंमतीत मिळतोय iPhone 16