लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट

तुम्ही देखील Windows 10 ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करत आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांतच कंपनी Windows 10 चा अधिकृत सपोर्ट(support) पूर्णपणे बंद करणार आहे. याबात कंपनीने अधिकृत घोषणा देखील केली आहे. कंपनीने केलेली ही घोषणा युजर्ससाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट ऑक्टोबर 2025 मध्ये Windows 10 साठी अधिकृत सपोर्ट पूर्णपणे बंद करणार आहे.

ऑक्टोबर 2025 पासून Windows 10 साठी युजर्सना कोणतेही सिक्योरिटी अपडेट किंवा टेक्निकल अपडेट जारी केले जाणार नाहीत. याबाबत भारत सरकारने त्यांच्या युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे(support). त्यामुळे जे युजर्स Windows 10 चा वापर करत आहेत, त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कंपनीने जर Windows 10 साठी जारी केले जाणारे सिक्योरिटी अपडेट किंवा टेक्निकल अपडेट थांबवले, तर Windows 10 ची सुरक्षा धोक्यात येऊ शकतो. याशिवाय Windows 10 युजर्सचा डेटा देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे.

CERT-In ने जारी केला अलर्ट
भारत सरकारच्या एजेंसी ‘इंडियन कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम’ (CERT-In) ने एक अ‍ॅडवाइजरी जारी केली आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ज्या युजर्सकडे Windows 10 द्वारे चालवले जाणारे डिव्हाईस आहेत, त्यांना वेळीच Windows 11 वर स्विच करा. ज्यामुळे युजर्सना सायबर सुरक्षा अपडेट मिळतील. जर एखादी संस्था किंवा व्यक्ती त्वरित अपग्रेड करू शकत नसेल, तर ते मायक्रोसॉफ्टच्या “पेड एक्सटेंडेड सिक्युरिटी अपडेट” सेवेचा पर्याय निवडू शकतात.

Windows 11 वर स्विच करणं गरेजचं आहे
मात्र जर एखाद्या युजरने Windows 11 वर स्विच केलं नाही आणि तो Windows 10 चाच वापर करत राहिला, तर त्याच्या सिस्टममध्ये सायबर हल्ल्यांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. सपोर्ट बंद झाल्यानंतर सुरक्षा अपडेट मिळणार नाहीत आणि सिस्टम कमजोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॅकर्स अशा डिव्हाईसवर अगदी सहजपणे सायबर हल्ला करू शकतात.

TPM 2.0 चिपची आवश्यकता
मायक्रोसॉफ्टसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे आजही जगभरातील 60% पेक्षा जास्त विंडोज पीसी Windows 10 वर चालत आहेत. Windows 7 वरून Windows 10 वर अपग्रेड करण्याचा मार्ग सोपा होता, परंतु Windows 11 मध्ये TPM 2.0 चिपची आवश्यकता आहे, याच कारणामुळे लाखो जुन्या सिस्टीम अपग्रेडमधून वगळण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत, यूजर्सना नवीन पीसी खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

Windows 11 मध्ये काय आहे खास?
Windows 11 कोणतेही नवीन सिस्टम नाही, मात्र यामध्ये सतत नवीन AI टूल्स जोडले जात आहेत. याचा इंटरफेस पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक आणि आधुनिक आहे. स्टार्ट मेनू आता मध्यभागी आहे आणि अनेक पारंपारिक वैशिष्ट्ये अ‍ॅप्सने बदलली आहेत. यासोबतच, त्याची कार्यक्षमता देखील पूर्वीपेक्षा अधिक नितळ आणि प्रतिसाद देणारी आहे.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..

बाप आहे की हैवान ! बाळाला रस्त्याच्या मधोमध फेकले अन्…; हृदय पिळटवून टाकणारा Video Viral