इचलकरंजीत आवाडे, कोरे, यड्रावकरांनी सोबत…; राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

शुक्रवारी अधिवेशनाच्या चहापानाच्या ठिकाणी(equations) आ. प्रकाश आवाडे, आ. विनय कोरे, आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षासोबत रहावं, असा आग्रह एका ज्येष्ठ नेत्यानं धरल्याचं चर्चेत आहे. ज्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या एकत्र येण्यामुळे आगामी निवडणुकांवर प्रभाव पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरोळ, इचलकरंजी, शाहूवाडी पन्हाळा या तीन मतदार संघातील विद्यमान(equations) आमदारांना ताकद देण्याबरोबर ते सोबत रहावेत, अशा हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत ज्या उद्देशाने कदाचित ज्येष्ठ नेत्यांनी विद्यमान आमदारांना गळ घालण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याचे कळते.

आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. प्रकाश आवाडे, या दोन आमदारांनी पाठींबा न घेता पक्षातून रहावं, असाही आग्रह असल्याचं कळालं, तर दुसऱ्या बाजूला आ. विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षातून निवडणूक लढवावी, पण हातकणंगले आणि चंदगड, मिरजमध्ये आग्रह धरू नये, अशी चर्चा झाल्याचंही समजते.

दल्यान बजेटच्या अधिवेशनातच आमदारांना याहून पक्ष बळकट करणं, नव्या जोडण्या लावणं सुरु केल्याचं समजून येत. आता पहावे लागेल. या तीन आमदारांची भूमिका काय असेल व इचलकरंजीतल्या भाजपची भूमिका नेमकी काय राहिल.

हेही वाचा :

माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

मोठी बातमी! HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना बसणार मोठा फटका

ठाकरे गटात Incoming सुरू ; ‘या’ माजी आमदाराची लवकरच घरवापसी ?