जिच्या हत्येच्या आरोपात पतीला अटक झाली ती काहीच दिवसांत प्रियकरासोबत सापडली

सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवेढ्यात मृत समजलेल्या विवाहित महिलेला पोलिसांनी तपास करत तिला कराडमध्ये तिच्या प्रियकरासोबत शोधून काढले आहे. त्यामुळे आता कडब्याच्या गंजीत जळालेला मृतदेह (death)कोणाचा हे तपासणे पोलिसांसमोर आव्हान आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

मंगळवेढ्यातील पाठखळ येथे सोमवारी मध्यरात्री कडब्याच्या गंजीला आग लागली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू(death) झाला. नवऱ्याने आपल्या पत्नीचा खून करून तिचा मृतदेह कडब्यात जाळल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण या घटनेला धक्कादायक वळण मिळालं आहे. ही घटना संशयास्पद आहे, असा आरोप करत विवाहित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि एक वेगळीच गोष्ट समोर आली. ज्या महिलेचा किरण सावंत हिचा मृत्यू झाला असा समज होता. ती महिला जिवंत असून कराडमध्ये एका व्यक्तीसोबत सापडली आहे. हा व्यक्ती तिचा प्रियकर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील दशरथ दांडगे यांची मुलगी किरण हिचे लग्न पाटकळच्या नागेश सावंत यांच्याशी झाले होते. त्यांना आरोही नावाची दोन वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर किरण तिच्या सासरच्या लोकांसोबत राहत होती. 14 जुलै रोजी पहाटे 3:30 वाजता एक फोन आला. किरणचे चुलत सासरे दत्तात्रेय सावंत यांनी किरणच्या वडिलांना फोन केला. “तुमची मुलगी किरणने स्वतःला पेटवून घेतले आहे, तुम्ही या,” असे त्यांनी सांगितले.

किरणचे नातेवाईक पाटखळला पोहोचले. तिथे खूप गर्दी होती. किरणचा नवरा नागेशने सांगितले की, किरणने स्वतःला पेटवून घेतले. मुलीला कोणी मारले? तेव्हा याची चौकशी करा अशी मागणी किरणचे वडील दशरथ दांडगे यांनी केली. घरासमोर कडब्याची गंजी जळाली होती. त्या आगीत एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. जळालेला मृतदेह ओळखण्यापलीकडे होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते.

मात्र पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली. मात्र नंतर किरण ही सातारा जिल्ह्यातील कराड इथं एका व्यक्तीसोबत सापडली आहे. त्यामुळे जळालेल्या मृतदेहाचे गूढ वाढले आहे. त्या मृतदेहाचे अवशेष सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. DNA तपासणी आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच त्या मृत (death)महिलेची ओळख पटू शकेल. प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी विवाहित किरण सावंत हिने प्रियकराच्या साथीने एका दुसऱ्याच महिलेचा मृतदेह आपल्या घरासमोर आणून जाळला आणि स्वत:च्या हत्येचा बनाव रचला, अशी चर्चा सुरू आहे. मात्र पोलिस तपासानंतर या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.

हेही वाचा :

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल

मैत्री, भेटायला बोलवलं अन् अत्याचार; १५ वर्षीय मुलीबरोबर खोलीत ‘नको ते घडलं’; परिसरात खळबळ

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO