व्यापारी आहात, व्यापार करा पण आमचे बाप बनू नका संदीप देशपांडेंचा इशारा

मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मनसे आणि (business)ठाकरे गटाने एकत्रितपणे भव्य मोर्चा काढला. सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, जनतेच्या प्रचंड सहभागामुळे अखेर पोलिसांनी माघार घेतली आणि मोर्चा मार्गस्थ झाला. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या भाषणातून हिंदी भाषिक व्यापार्‍यांना थेट इशारा दिला.देशपांडे म्हणाले, “व्यापारी आहात, व्यापार करा… पण आमचे बाप बनू नका. 2 हजार मैलांवरून इथे येऊन दादागिरी नको. हा महाराष्ट्र आहे, येथे काय होणार आणि काय नाही, हे आम्ही मराठी लोक ठरवणार. राजकारणात लुडबुड करू नका, इथे फक्त धंदा करा.”

आपल्या जोरदार भाषणात देशपांडे म्हणाले की, “महाराष्ट्रात मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसेल. आम्ही केवळ गर्व नाही तर माज बाळगतो, आणि तो आज दाखवला आहे. इथे येऊन माज दाखवायचा नाही, कारण इथे माज फक्त आमचाच चालतो.”त्यांनी पुढे म्हटले की, “ज्यांना ‘श’ म्हणता येत नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये. आमच्या भूमीत आम्हालाच उपदेश देण्याचा प्रयत्न केला, तर चांगलंच उत्तर मिळेल. (business)मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही.”

या मोर्चात ठाकरे गटाचे नेते राजन विचारे हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी म्हटले, “मराठी माणूस आज एकत्र आला आहे. मुंबईपासून मीरा-भाईंदरपर्यंत मराठी जनतेचा रोष उसळला आहे. मोर्चा रोखण्याचा प्रयत्न फसला. आम्ही एकत्र आलो की कोणतीही ताकद थांबवू शकत नाही.”विचारे पुढे म्हणाले, (business)“गुजराती व्यापाऱ्यांचा मोर्चा तुम्ही काढू देता, पण आम्हाला रोखता? हे सरकारला आणि पोलिसांना समजून घ्यावं लागेल की मराठी अस्मितेशी खेळल्यास त्याचा स्फोट होतो.”

हेही वाचा :

शंभर कोटी रुपयांचे रस्तेच चोरीला गेलेत !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!

Honor चा नवीन दमदार 5G Smartphone भारतात लाँच, 108MP कॅमेरा आणि 6600mAh बॅटरी… किंमत तुमच्या बजेटमध्ये