युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो….– प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे

डी के ए एस सी मध्ये एकदिवसीय युवा महोत्सव कार्यशाळा संपन्न

इचलकरंजी : विद्यार्थ्यांच्या(students) शैक्षणिक प्रगती बरोबरच त्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन समृद्ध बनवणं ही महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. याच विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील विद्यार्थी कलाकार आपल्या कलेचा वारसा पुढे चालवत असतात. आणि यातूनच मोठे कलाकार जन्माला येतात. यासाठी युवा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा भाग आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले. शिवाजी विद्यापीठ आणि डी के ए एस सी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय एकदिवसीय युवा महोत्सव माहिती कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव एक दिवसीय माहिती कार्यशाळेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी(students) विकास विभागाचे संचालक डॉ टी. एम. चौगुले, युवा महोत्सव कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. आर. एच. अतिग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना डॉ. टी. एम. चौगुले यांनी “जिल्हास्तरीय आणि मध्यवर्ती युवा महोत्सवांच्या माध्यमातून महाविद्यालयातील कलाकारांना संधी मिळतेच परंतु यातून विद्यापीठाची कलाकारांची चांगली मोट बांधून इंद्रधनुष्य सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाने मोठे यश मिळावे हे आपले प्रत्येकवर्षी स्वप्न असते.” असे मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. आर. एच. अतिग्रे , श्रीमती एस. टी. आडके यांनी मार्गदर्शन केले.

जिव्हाजी सांस्कृतिक भवन येथे उद्घाटन सत्र संपन्न झाल्यानंतर दिवसभर महाविद्यालयांमध्ये विविध कला प्रकारातील तज्ञ मार्गदर्शक श्री. संग्राम भालकर, श्री.महेश पाटील, श्री. संदीप जंगम. प्रा. प्रमोद पाटील, श्री बबन माने, श्री. नितीन शिंदे, श्री.ऋषिकेश देशमाने, श्री चैतन्य देशपांडे, श्री गणेश शंकर, श्री आकाश, श्री गाडे, श्री सुमंत कुलकर्णी यांनी विद्यार्थी कलाकारांना मार्गदर्शन केले. नृत्य, संगीत, नाट्य ललित आणि वांग्मय या विविध कला प्रकारांमध्ये मार्गदर्शन झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील ४७ महाविद्यालयातील २१५ विद्यार्थी आणि ८७ शिक्षक असे ३१५ विद्यार्थी(students) शिक्षक सहभागी झाले होते.

या कार्यशाळेस श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, सेक्रेटरी प्राचार्या डॉ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. दीप प्रज्वलन आणि संस्था प्रार्थनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी केले तर प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी. के वाघमारे यांनी केले. यावेळी दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए. यादव, सकाळ सत्र प्रमुख प्रा. व्ही. पी. पाटील, प्रबंधक श्री. आर. बी. जोग यांच्यासह सांस्कृतिक विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डॉ. ए. एच. बोगुलवार यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. रोहित शिंगे यांनी केले.

हेही वाचा :

पडळकर व आव्हाड यांनी जे पेरलं तेच उगवलं….!

धक्कादायक ! सिगारेटसाठी लायटर दिलं नाही म्हणून आला राग; लोखंडी पान्याने केली भावाची हत्या

स्टंटमन राजूच्या मृत्यूने अक्षय कुमार हादरला! थेट 3 कोटींहून अधिक रुपयांचा…