भयंकर दुष्काळाची चाहूल, एकनाथ शिंदेंच्या ट्विटने चिंता वाढली, जनतेला भावनिक आवाहन, म्हणाले आता..

यंदा अल् निनोचा प्रचंड फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी हातबल झाले आहेत. गेल्याच आठवड्यात राज्यात दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे.

महाराष्ट्रात यंदा पाऊसच झाला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दिलेल्या ओढीमुळे संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला आहे. खरीप हंगाम तर हातचा गेलाच पंरतु आता रब्बी हंगामावर देखील मोठं सकंट आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुरेसा पाऊस झाला नसल्याने अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील समस्या गंभीर बनली आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान गेल्याच आठवड्यात सरकारने राज्यात दुष्काळाची घोषणा केली आहे. राज्यातील जवळपास 75 टक्के भागामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पोस्ट केली आहे.

यंदा पावसाने दगा दिला, निसर्गाचा प्रकोप झाला. पिके करपली. अनेक ठिकाणी उभ्या पिकांनी माना टाकल्या. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. आपला अन्नदाता बळीराजा दुष्काळाच्या भीषण परिस्थितीशी दोन हात करत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही आपल्या सर्वांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. मी नेहमी सांगत आलो आहे की, “या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा आहे!” आमचे महायुती सरकार आणि शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने व खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे.

सरकार म्हणून आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोतच, पण एक समाज म्हणूनही आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. शेतकरी चिंताक्रांत असताना आगामी काळातील धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव धुमधडाक्यात साजरे करणे योग्य ठरणार नाही. म्हणूनच, नवरात्रोत्सव आणि पुढील काळातील अन्य उत्सव, समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करूया. या सर्व कार्यक्रमांचा निधी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी द्यावा, असे नम्र आवाहन मी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सामाजिक संस्थांना आणि राज्यातील जनतेला करतो. अन्नदाता संकटात असताना त्याच्यासोबत आपण सर्वजण खंबीरपणे उभे राहिलो तर या नैसर्गिक संकटावर आपण नक्कीच मात करू, असा मला विश्वास आहे.

यंदाच्या उत्सवाचा खर्च वाचवून जर आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसू शकलो आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकलो, तर तीच आदिशक्ती जगदंबेची खरी सेवा ठरेल! असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.265 तालुक्यात दुष्काळ जाहीर दरम्यान सरकारने गेल्याच आठवड्यात राज्यात दुष्काळाची घोषणा केली असून, या अंतर्गत आता 265 तालुक्यांमध्ये दुष्काळा संदर्भातील उपाय योजना करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये अन्नधान्याची सोय, परीक्षा शुक्ल माफी, जनावरांना चाऱ्याची सोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा विविध उपाय योजना राबवण्यात येणार आहेत.

हेही वाचा : 

बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती

शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी

धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार